शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बाबो! Fortuner कारमध्ये बनवलं टॉयलेट, आता गाडीतून खाली उतरण्याची पडणार नाही गरज, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:58 IST

Toyota Fortuner Modifications: पठ्ठ्यानं कार केली मॉडिफाय. सध्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Toyota Fortuner with Built in Toilet: जेव्हा आपण दूरचा प्रवास करतो तेव्हा आपण मोठी तयारी करतो. लोक जेवणापासून ते राहण्यापर्यंत आणि झोपेपर्यंत सर्व व्यवस्था करतात. पण सर्वात मोठी समस्या शौचालयाची येते. पण जर तुमच्या गाडीत टॉयलेट शीट बसवली असेल तर? एका व्यक्तीने आपल्या टोयोटा फॉर्च्युनर कारमध्ये अशाप्रकारे बदल केले की त्यात टॉयलेट शीट बसवली. Revokid Vlogs नावाच्या YouTube चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

बाहेरून पाहिलं तर ही कार सामान्य टोयोटा फॉर्च्युनरसारखी दिसते. परंतु सर्वात मोठा बदल तिच्या तिसऱ्या रो मध्ये दिसून येतो. SUV च्या तिसऱ्या रो मध्ये मोबाईल टॉयलेट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रसाधनगृहात पाण्याच्या सोयीसाठी मागील बाजूस खास टाकी देण्यात आली आहे.

टॉयलेटचा आकार इतका कॉम्पॅक्ट आहे आणि ते तिसऱ्या रांगेत फक्त एका सीटची जागा घेतो. त्याच्या शेजारील सीट आरामात बसण्यासाठी वापरता येते. म्हणजेच टॉयलेट बसवल्यानंतरही ही कार 6 सीटरच राहते.सहसा तुम्ही कोणत्याही व्हॅनिटी व्हॅनमध्ये अशा प्रकारचे टॉयलेट पाहिले असेल. कॅम्पिंग करताना किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करताना हे खूप उपयुक्त ठरू शकते. यूट्यूब व्हिडिओच्या वर्णनात असे म्हटले आहे की या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये बदल करण्याचे काम OJES AUTOMOBILES ने केले आहे. हे टॉयलेट खास दिव्यांगांसाठी बसवण्यात आले आहे. कारचा उपयोग चॅरीटी कामांसाठी केला जातो. या प्रकारच्या मॉडिफिकेशनसाठी साधारणतः 70 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो.

टॅग्स :ToyotaटोयोटाSocial Viralसोशल व्हायरलYouTubeयु ट्यूब