शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
3
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
4
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
5
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
6
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
7
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
8
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
9
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
10
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
11
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
12
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
13
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
14
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
15
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
16
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
17
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
18
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
19
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
20
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   

नशीब असावं तर असं! एकाच कुटुंबातील तिघांना लागली 41-41 लाखांची लॉटरी; जाणून घ्या नेमकं काय घडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 21:39 IST

अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांनी समान क्रमांक असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली. विशेष म्हणजे, या तिघांनाही 50,000 डॉलरचे (जवळपास 41 लाख रुपये) बक्षीस मिळाले.

नशिब काय चीज असते, हे बघायचे असेल, तर एकदा लॉटरीच्या जगात डोकावून पाहा. येथे कुठल्याही क्षणी लोकांचे नशीब बदलते. येथे गरीब लोक श्रीमंत होतात. तर श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होतात. खरे तर, भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉटरीवर बंदी आहे. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनमधील लोक लॉटरीच्या माध्यमाने आपले नशीब आजमावताना दिसतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील एक कुटुंब. या कुटुंबातील एक, दोन नाही, तर तब्बल तीन जणांनी 41-41 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांनी समान क्रमांक असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली. विशेष म्हणजे, या तिघांनाही 50,000 डॉलरचे (जवळपास 41 लाख रुपये) बक्षीस मिळाले. संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने 13 ऑक्टोबरच्या पिक 5 ड्रॉसाठी 5-3-8-3-4 गुण वापरले आणि ते विजेते ठरले.

1 डॉलरमध्ये खरेदी केलं तिकीट -मेरीलँड लॉटरीनुसार, एका 61 वर्षीय व्यक्तीने हॅम्पस्टेडमध्ये 1 डॉलरमध्ये  टिकट खरेदी केले. यानंतर त्याची 28 वर्षीय मुलगी आणि 31 वर्षांच्या मुलाने एकाच दुकानातून एकाच ड्रॉसाठी तिकीट खरेदी केले. या सर्वच्या सर्व तीनही तिकिटांमध्ये विजेता क्रमांक 5-3-8-3-4 हा होता आणि  सर्वांनाच 50,000 डॉलरचे रोख बक्षीस मिळाले. 

नशीब चमकलं - लॉटरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेत्यांपैकी एकाने जिंकलेल्या पैशांतून घर खरेदीची करण्याचे ठरवले आहे. तर, इतर दोन लोक जिंकलेल्या पैशांची गुंतवणूक करणार आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल