शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

"पाऊस प्रत्येकासाठी रोमँटिक नसतो..."; स्विगी डिलिव्हरी बॉयचा Video पाहून पाणावतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 12:35 IST

एका स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात तो ग्राहकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी धडपडत आहे.

आज ऑनलाईन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरीचा व्यवसाय खूप मोठा झाला आहे. अल्पावधीतच घरपोच अन्न पोहोचवण्याची सुविधा लोकांना फार आवडते. आपल्याला त्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही. पण कोणी ना कोणी यासाठी कठोर परिश्रम करत असतं, जसे की रेस्टॉरंटचे कर्मचारी किंवा फूड डिलिव्हरी करणारी लोक. परिस्थिती कोणतीही असो ते आपल्याला काम करताना दिसतात.

एका स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात तो ग्राहकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी धडपडत आहे. डिलिव्हरी बॉय आपल्या बाईकवर भर पावसात भिजत असलेलं व्हिडीओमध्ये पाहायला आहे. अंकुश शर्मा नावाच्या एका युजरने हा व्हि़डीओ शेअर केला आहे. "हे दृश्य हृदयद्रावक आहे. मी वचन देतो की आजपासून माझ्यापर्यंत फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक रायडरला मी २० रुपये टीप देईन" असं म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर एक कॅप्शन देण्यात आलं आहे. जे सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतं आहे. "पाऊस प्रत्येकासाठी रोमँटिक नसतो" असं म्हटलं आहे. एका युजरने कंपन्यांनी किंमती वाढवून या लोकांना चांगला पगार द्यावा असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्याने अन्न कोणत्या परिस्थितीत आपल्यापर्यंत पोहोचतं ते पाहा असं म्हटलं आहे. 

डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ आणि त्यावरील कॅप्शन सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. याआधीही फूड डिलिव्हरी बॉयचे असे अनेक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आले असून ते जोरदार व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :Swiggyस्विगीSocial Viralसोशल व्हायरल