शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 18:55 IST

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही.

कोलंबो- सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच 70 वर्षांच्या हत्तिणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील हत्तिणीची अवस्था पाहून अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. एवढी कुपोषित हत्तिणी पाहून सोशल मीडियावर सर्वच अवाक् झाले असून, हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या फोटोतल्या हत्तिणीचं नाव टिकीरी असून, तिला निवृत्त न करता तिच्याकडून काम करून घेतलं जातंय.श्रीलंकेत दहा दिवसांच्या परेरा सणाचं आयोजन केलं जातं. वर्ल्ड एलिफंट डे साजरा केल्यानंतर दोन दिवसांनी या हत्तिणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या परेरा फेस्टिव्हलमध्ये टिकीरी नावाच्या हत्तिणीवर रंगीबेरंगी कपडे चढवण्यात आले असून, फेस्टिवलदरम्यान तिला दहा दिवस प्रत्येक रात्री काही किलोमीटर अंतर चालवले जात होते. या हत्तिणीवर एक माहुत बसलेलाही पाहायला मिळतोय. या हत्तिणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सेव्ह एलिफन्ट फाऊंडेशननं गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर श्रीलंका सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. हत्तिणीचा मालक आणि तिच्याकडून परेड करून घेणाऱ्यावर टीकेची झोड उठली आहे. पर्यटन आणि वन्यजीव मंत्री जॉन अमरातुंगा यांनी अधिकाऱ्यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.