शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सारा तेंडुलकर शुभमन गिलची बायको; (सचिनसाठी) गुगलचा 'जावई'शोध

By कुणाल गवाणकर | Updated: October 15, 2020 09:43 IST

Sara Tendulkar Shubman Gills Wife: 'शुभमन गिलची बायको' सर्च केल्यावर गुगल म्हणतं 'सारा तेंडुलकर'

दुबई: आयपीएलचा (Indian Premier League) तेरावा हंगाम मैदानासोबत मैदानाबाहेर गाजत आहे. कोरोना संकटामुळे आयपीएल स्पर्धा दुबईत खेळवण्यात येत असली तरीही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. सोशल मीडियावरही आयपीएलची जोरदार चर्चा आहे. आयपीएलमधील संघ, खेळाडू, त्यांची कामगिरी, मैदानाबाहेरचे किस्से यांचे मिम्स व्हायरल होत आहेत. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानची बायको सर्च केल्यावर गुगल अनुष्का शर्माचं नाव दाखवत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच झाली. आता अशाच कारणामुळे युवा क्रिकेटपटू शुभमन गिल चर्चेत आला आहे.शुभगन गिलची बायको असं सर्च केल्यावर गुगलकडून सारा तेंडुलकर असं उत्तर मिळतं. सारा ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या आहे. तर शुभमन सध्या कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करतो. शुभमन गिल २१ वर्षांचा आहे. त्याचं लग्न झालेलं नाही. पण मग 'शुभगन गिल वाईफ' सर्च केल्यावर साराचं नाव समोर का येतं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात आहे.

शुभमन साराचा प्रियकर असल्याची चर्चा याआधीही अनेकदा झाली. काही दिवसांपूर्वी शुभमननं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. नवी कार खरेदी केल्यानंतरचा हा फोटो होता. त्यावर सारानं अभिनंदनाची कमेंट केली होती. त्या कमेंटपुढे काळ्या रंगाचं हार्ट होतं. शुभमननंही हार्ट इमोजी वापरून साराचे आभार मानले. ही बाब क्रिकेटपटू हार्दिक पांड्यांच्या लक्षात आली. त्यानं शुभमनची थट्टा करण्यासाठी लगेच कमेंट केली. 'तिच्याकडूनही तुझे खूप खूप आभार' अशी कमेंट हार्दिकनं केली. त्यानंतर शुभमन आणि साराचं नाव अनेकदा एकत्र चर्चेत आलं.
२९ जुलैला सारानं तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तर शुभमन गिलनं त्याच दिवशी स्वत:चा एक फोटो ट्विट केला. दोन्ही फोटोचं शिर्षक एकच (आय स्पाय) होतं. याचीही बरीच चर्चा झाली. अनेकांनी फोटोखाली कमेंट करून याकडे लक्ष वेधलं होतं. दोनच दिवसांपूर्वी (१२ ऑक्टोबर) साराचा वाढदिवस होता. त्या दिवशी केकेआरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होता. या सामन्यात शुभमननं चांगली सुरुवात केली. मात्र तो ३४ धावांवर बाद झाला. याचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.    

टॅग्स :IPL 2020IPL 2020Sara Tendulkarसारा तेंडुलकरShubhman Gillशुभमन गिलSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAnushka Sharmaअनुष्का शर्माKolkata Knight Ridersकोलकाता नाईट रायडर्स