शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:58 IST

Shocking Video: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात अत्यंत संतापजनक घटना घडली.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात अत्यंत संतापजनक घटना घडली. बाईक टॅक्सीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा दोन दुचाकीस्वारांनी विनयभंग केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना ७ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडल्याचे समजत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) जयपूरमधील इस्कॉन रोड परिसरात घडली. पीडित तरुणी रॅपिडो बाईक टॅक्सीने प्रवास करत असताना, दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला या दोघांनी तरुणीवर अश्लील शेरेबाजी केली. तरुणीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे तरुणांची हिंमत अधिकच वाढली. त्यांनी आपली दुचाकी तरुणीच्या बाईकच्या अगदी जवळ आणली आणि तिला लज्जास्पद रितीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, चालत्या दुचाकीवर तरुणीचा शर्ट वर उचलण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला.

घाणेरड कृत्य कॅमेऱ्यात कैद

हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला, ज्याची दखल जयपूर पोलिसांनी स्वतःहून घेतली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी तपास केला असता, आरोपींची ओळख पटली आहे.

पोलीसाचा तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनराज आणि सुदामा अशी आरोपींची नावे असून दोघेही राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून दोन्ही आरोपी फरार आहेत. "आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. टोंक आणि आसपासच्या परिसरात त्यांचा शोध सुरू असून  लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील", असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaipur: Girl harassed on bike taxi, video goes viral.

Web Summary : In Jaipur, two men on a motorcycle harassed a girl riding a bike taxi, attempting to grope her. The video went viral, sparking outrage. Police identified the suspects, Manraj and Sudama, who are now absconding. Police are actively searching for them.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलjaipur-pcजयपूरRajasthanराजस्थान