शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आता भोगा! कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला अन् 'कर्मा'नं गेला; रिक्षाचा अपघात कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 13:50 IST

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पिंपरी चिंचवड : रस्त्यावर शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारणं एका रिक्षा चालकाला महागात पडलं आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात रिक्षाला अपघात झाला आणि चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला. यानंतर नियंत्रणाबाहेर गेलेल्या रिक्षानं दुभाजक ओलांडला. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला चालत्या रिक्षातून लाथ मारण्याचा प्रयत्न चालक करत असताना हा अपघात झाला. दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठा अपघात टळला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला पाय फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे दुभाजक आणि रिक्षा यांच्यात बरंच अंतर होतं. त्यामुळे रिक्षा चालकानं दुभाजकाच्या जरा जवळून रिक्षा नेली असती, तर हा प्रकार घडला नसता. पण कुत्र्याला लाथ मारण्यासाठी चालकानं रिक्षा त्याच्या जवळून नेली आणि अपघात झाला.