शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यात श्रीमंत यू-ट्युबवाला! लाखो डॉलर्सची बक्षीसे वाटत फिरतो... चकित झालात ना....

By अमेय गोगटे | Updated: December 18, 2022 07:53 IST

गेमिंग व्हिडीओ आणि इतर यू-ट्युबर्सच्या कमाईची इंटरेस्टिंग माहिती देणारे व्हिडीओ तो चॅनलवर पोस्ट करायचा. आज याच ‘मिस्टर बीस्ट’च्या कमाईची नेटिझन्स चर्चा करतात.

- अमेय गोगटे, लोकमत डॉट कॉम १०० दिवस वर्तुळात राहून दाखवा, ५ लाख डॉलर जिंका... शार्क असलेल्या समुद्रात पोहून दाखवाल?; १ लाख डॉलर्स बक्षीस देतो... हा कोट्यवधींचा हिरा चोरून दाखवा, तुमच्याकडेच ठेवा... लपाछुपी खेळा, बक्षिसाची रक्कम आहे, १० लाख डॉलर्स... 

चकित झालात ना? महागाई, रिसेशन अशा चर्चा सुरू असताना हे वरचे आकडे वाचून धक्का बसणं स्वाभाविकच आहे; पण या नुसत्याच घोषणा नाहीत बरं. हे प्रत्यक्ष घडलं आहे आणि अनेकांनी ही बक्षिसं जिंकलीही आहेत. खोटं वाटत असेल तर, यू-ट्युबवर जा. लाखो-करोडोंची चॅलेंजेस करणारा, जगातील सगळ्यात श्रीमंत यू-ट्युबर ‘मिस्टर बीस्ट’ तिथे भेटेल आणि त्याचे जगावेगळे कारनामेही पाहता येतील.

जिम्मी डोनाल्डसन. वय २४ वर्षे. दहा वर्षांपूर्वी त्यानं ‘MrBeast6000’ हे यू-ट्यब चॅनल सुरू केलं. गेमिंग व्हिडीओ आणि इतर यू-ट्युबर्सच्या कमाईची इंटरेस्टिंग माहिती देणारे व्हिडीओ तो चॅनलवर पोस्ट करायचा. आज याच ‘मिस्टर बीस्ट’च्या कमाईची नेटिझन्स चर्चा करतात. त्याला कारण ठरला, २०१७ मधला एक व्हिडीओ. कंटाळा आला म्हणून ‘एक ते एक लाख’ आकडे म्हणायचं त्याने ठरवलं, ३५ तासांहून जास्त वेळ एकाच खुर्चीत बसून, काहीही न खाता-पिता त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग अनेक ‘रेकॉर्ड’ ‘मिस्टर बीस्ट’च्या नावावर जमा झाले. आज त्याच्या चॅनलचे सबस्क्राईबर आहेत, ११ कोटी ९० लाख आणि व्हिडीओ व्ह्यूज आहेत, १९ अब्ज ९० कोटी ८४ लाख ३३ हजार ४७२.

दर आठवड्याला ‘मिस्टर बीस्ट’चा व्हिडीओ येतोच असं नाही. कधी कधी तो महिन्यातून एकच व्हिडीओ करतो, पण तो एकदमच हटके असतो. ‘स्क्विड गेम’ या वेबसीरिजवरून केलेलं ‘स्क्विड गेम चॅलेंज’ हा चॅनलवरचा सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. काहींना हा सगळा वेडेपणा वाटू शकतो, पण तरुणाई वेड्यासारखे हे व्हिडीओ पाहते. कोट्यवधींची बक्षिसं वाटणाऱ्या ‘मिस्टर बीस्ट’ची कमाईही कोटींच्या घरात आहे. त्यातील एक वाटा सामाजिक कार्यासाठी देणारा, लोकप्रियतेचा फायदा निधी संकलनासाठी करणारा मिस्टर बीस्ट ‘बडे दिलवाला’च म्हटला पाहिजे.    

टॅग्स :YouTubeयु ट्यूब