सिडनीहून अमेरिकेच्या टेक्सास येथे जाणाऱ्या क्वान्टास एअरवेजच्या फ्लाईटमध्ये एका घटनेने चांगलाच गोंधळ उडाला. या विमानाच्या उड्डाणानंतर ४ तासांनी एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. स्थिती इतकी गंभीर झाली की पायलटला वाटेतूनच पुन्हा माघारी फिरावे लागले. हे विमान पुन्हा सिडनीला वळवण्याचा निर्णय पायलटने घेतला. परंतु सुरक्षित लँडिगसाठी विमानाचं वजन कमी करणे गरजेचे होते. त्यासाठी पायलटने प्रशांत महासागरात कोट्यवधी किंमतीचे हजारो लीटर हवेतच ओतले.
नेमकं काय झाले?
या विमानाने सिडनी एअरपोर्टहून टेक्साससाठी उड्डाण घेतले होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही तासांनी अचानक एका प्रवाशाला वैद्यकीय अडचणीचा सामना करावा लागला. केबिन क्रू यांनी तातडीने प्रवाशाला प्राथमिक उपचार दिले आणि जमिनीवरील डॉक्टरांशी संपर्क साधला. या प्रवाशाची प्रकृती पाहून कॅप्टनने त्याचा जीव वाचवण्यासाठी विमान तातडीने माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. हाच एक सुरक्षित पर्याय होता.
हवेतच इंधन केले खाली
हे एक लांब पल्ल्याचे आंतरराष्ट्रीय उड्डाण असल्यामुळे विमानात मोठ्या प्रमाणात इंधन होते. एवढ्या जास्त वजनासह विमान उतरवणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे, उत्तर फिजी खोऱ्यावरून जात असताना पायलटने विमानातील इंधन खाली टाकण्याची प्रक्रिया केली. त्याला फ्यूल डंपिंग असं म्हटलं जाते. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंग करण्यासाठी विमानातील अतिरिक्त तेल काढणे गरजेचे असते.
दरम्यान, या विमानातील एका प्रवाशाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंधनाचा अपव्यय पाहून दु:ख होतंय परंतु एका माणसाचा जीव मौल्यवान आहे असं या प्रवाशाने लिहिले. ऑस्ट्रेलियात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि जागतिक इंधन संकट पाहता हजारो लीटर तेल समुद्रात ओतण्याच्या या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले. जास्त उंचीवर तेल टाकल्यामुळे ते जमिनीवर किंवा पाण्यावर पोहोचण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होते त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते असं सांगत ही एक मानक सुरक्षा प्रक्रिया आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं.
Web Summary : A Quantas flight pilot dumped fuel over the Pacific Ocean to safely land after a passenger fell ill. The fuel dump, a standard safety procedure, sparked debate due to rising fuel costs. Experts say the fuel evaporates before reaching the ground, minimizing environmental impact.
Web Summary : क्वांटस की उड़ान में एक यात्री के बीमार होने के बाद पायलट ने सुरक्षित लैंडिंग के लिए प्रशांत महासागर में ईंधन गिरा दिया। बढ़ते ईंधन की लागत के कारण इस प्रक्रिया पर बहस छिड़ गई। विशेषज्ञों का कहना है कि ईंधन जमीन पर पहुंचने से पहले ही वाष्पित हो जाता है।