शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयद्रावक! घर सोडू नये म्हणून आई-वडिलांची धडपड; लेकासमोर हात जोडले, पाया पडले पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:26 IST

काही मुलं त्यांच्या पालकांना घरातून हाकलून देतात, तर काही लोक त्यांच्या वृद्ध आईवडिलांना सोडून इतरत्र राहतात.

रविवारी फादर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर ह्रदयस्पर्शी मेसेज आणि फोटो पाहायला मिळाले. फादर्स डे साजरा करण्यासाठी जगभरातील लोकांनी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो आणि त्यांच्या सन्मानार्थ मेसेज शेअर केला. अर्थात मदर्स डेच्या दिवशीही असंच दृश्य पाहायला मिळतं. मात्र, भारतात वृद्धाश्रमांची वाढती संख्या वेगळंच चित्र सांगत आहे. अनेक वयोवृद्ध पालकांनाही त्यांच्या भविष्याची भीती वाटते.

काही पालकांना त्यांच्या मुलांकडून आशा आहेत, त्यांच्यासोबत राहण्याचे स्वप्न आहे पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच येते. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओने लोकांचा विचार करायला भाग पाडले आहे. काही मुलं त्यांच्या पालकांना घरातून हाकलून देतात, तर काही लोक त्यांच्या वृद्ध आईवडिलांना सोडून इतरत्र राहतात. या व्हिडीओमध्ये वृद्ध आई-वडील आपल्या मुलाच्या पाया पडताना दिसत आहेत. तसेच सुनेला घराबाहेर न पडण्याची विनंती करताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुणाच्या पाया पडत आहे तर एक वृद्ध महिला हात जोडून उभी आहे. हात जोडून उभी राहणारी व्यक्ती ही मुलाची आई आहे. वडील तरुणाचे पाय धरतात पण मुलगा ऐकत नाही. आई-वडील मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा पाठलाग करतात. आई देखील असहायपणे आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना मुलाला थांबवण्यासाठी मदतीची याचना करत असते. 

वृद्ध आई-वडील आपल्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. yashofficialy20 ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने अनेक युजर्सला भावूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल