शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Video - मुलगा पायलट, आई फ्लाईट अटेंडंट; केली खास अनाउन्समेंट, लोकांनी वाजवल्या टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:38 IST

आपल्या आईसोबत एकाच फ्लाइटमध्ये उपस्थित राहिल्याने पायलटला खूप आनंद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.

एका पायलटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या फ्लाइट अटेंडंट आईसाठी घोषणा करताना दिसत आहे. याच दरम्यान तो जे काही बोलला, त्याने सर्वांची मनं जिंकली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकांनी व्हिडीओ खूप लाईक केला आहे. तो घोषणा करताच विमानात बसलेले लोक टाळ्या वाजवू लागतात. आपल्या आईसोबत एकाच फ्लाइटमध्ये उपस्थित राहिल्याने पायलटला खूप आनंद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.

युनायटेड एअरलाइन्सच्या या फ्लाइटमध्ये आई आणि मुलगा दोघंही काम करतात. युनायटेड एअरलाइन्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शन 'जेव्हा तुमचा लंच पॅक करणारी व्यक्ती तुमची सहकारी निघते' असं म्हटलं आहे,  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमान उड्डाण करण्यापूर्वी पायलट एक घोषणा करतो. आधी तो हवामानाची माहिती देतो आणि नंतर विमानात बसलेल्या प्रवाशांचे स्वागत करतो.

यानंतर पायलट सांगतो की, ही फ्लाइट त्याच्या आईमुळे खास आहे, ती फ्लाइट अटेंडंट आहे. व्हिडिओच्या शेवटी तो सर्वांसमोर त्याच्या आईची ओळख करून देतो. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी एअरलाइन्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. याला आतापर्यंत 1.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.

व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं की, माझ्या डोळ्यात पाणी आले.' आणखी एका युजरने म्हटले की, 'मला अशा कौटुंबिक कथा आवडतात.' तिसरा युजर म्हणाला, 'अरे, खूप आवडलं. हे खूप गोड आहे. सध्या या व्हि़डीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल