शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Video - स्टॅच्यू! जंगलाचा राजा जवळ आला, भीतीनं 'तो' कर्मचारी पुतळाच बनला; अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:32 IST

Tourist With Lion Video : जंगलात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गाडीजवळ अचानक सिंह पोहोचल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला पाहून सर्वांनाच घाम फुटतो. भीतीने थरकाप उडतो. सिंहाला पाहिल्यावर जंगलातील मोठमोठे प्राणी देखील घाबरतात. अशावेळी सिंहासमोर माणूस तर काहीच नसतो. सध्या सोशल मीडियावर जंगल सफारीचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. जंगलात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गाडीजवळ अचानक सिंह पोहोचल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सिंह या पर्यटकांच्या जवळ पोहोचतो. मात्र, पुढे काय होते ते पाहून तुम्हाला हेही समजेल की कोणताही प्राणी विनाकारण हल्ला करत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आफ्रिकेच्या साबी सबी रिझर्व्हचा आहे. जंगल सफारीसाठी गेलेले लोक जीपमध्ये बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खडबडीत रस्त्यावरून गाडी जात असताना समोरून दुसरी गाडी येते. त्यामुळे दोन्ही वाहने थांबवावी लागतात. तेव्हाच एक सिंह जंगलातून बाहेर पडतो आणि वाहनांजवळ येतो. जीपच्या बोनेटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या सिंह अगदी जवळ गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

सिंह त्या व्यक्तीच्या इतका जवळ जातो की ती व्यक्ती घाबरून पुतळाच होते. काही वेळासाठी श्वास रोखून धरते. आपण पाहू शकता की व्यक्ती अजिबात हलत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या व्यक्तीला असे बसलेले पाहून सिंहही त्याच्यावर हल्ला करत नाही आणि सरळ त्याच्या मार्गावर जातो. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर richard.degouveia नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच 'ट्रॅकर्स सीटवर तुम्हाला कसं वाटेल? सबी सबी अभयारण्यातील प्राणी आजूबाजूला वाहनांच्या उपस्थितीकडे लक्ष देत नाहीत' असं कॅप्शन लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल