शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:08 IST

Payal Gamingg clarification on mms leak viral video: पायल गेमिंग म्हणजेच पायल धारे हिने इन्स्टाग्राम स्टोरीमार्फत म्हणणं मांडलंय

Payal Gamingg clarification on mms leak viral video: सध्या सोशल मिडिया आणि गुगलवर पायल गेमिंग हे नाव प्रचंड ट्रेंड होत आहे. पायल गेमिंग म्हणजेच पायल धारे हे नाव चर्चेत येण्यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. एक खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो याच तरुणीचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे. परंतु, प्राथमिक माहिती आणि चाहत्यांच्या दाव्यानुसार हा व्हिडिओ डीपफेक टेक्नोलॉजीचा वापर करून तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तशातच आता पायलने स्वत: याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

"एवढ्या वैयक्तिक स्तरावरील त्रासदायक गोष्टीबद्दल मला सार्वजनिकपणे बोलावं लागेल अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून, डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जात असलेल्या एका व्हिडिओशी माझे नाव आणि फोटो चुकीच्या पद्धतीने जोडणारा कॉन्टेंट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. मला हे स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे सांगायचे आहे की, त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही, आणि त्याचा माझ्या आयुष्याशी, माझ्या निवडींशी किंवा माझ्या ओळखीशी काहीही संबंध नाही."

पायलने पुढे लिहिले, "गैरसमज पसरवला जातोय हे वेदनादायी आहेच, पण डिजिटल जगात एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला किती सहजपणे आणि वेगाने धक्का पोहोचवला जाऊ शकतो ही सर्वात वेदनादायक गोष्ट आहे. या कृतींचे परिणाम केवळ डिजिटल जगापुरते मर्यादित नाहीत, तर ते खऱ्या आयुष्यातील लोकांवर आणि कुटुंबांवर परिणाम करतात. नकारात्मकत गोष्टी घडतात तेव्हा शांत राहणेच चांगले असते. पण मी काही गोष्टींची स्पष्टता करण्यासाठी हे बोलत आहे."

"माझे म्हणणे केवळ माझ्यासाठीच नाही, तर अशा अनेक महिलांसाठी आहे, ज्यांना ऑनलाइन गैरवर्तन आणि चारित्र्यहननाच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. हा निरुपद्रवी कॉन्टेंट नाही, तर अत्यंत वेदनादायक प्रकार आहे. मी जनतेला आणि प्रसारमाध्यमांच्या सदस्यांना नम्रपणे विनंती करते की त्यांनी हा व्हिडीओ व फोटो शेअर करणे, रिशेअर करणे किंवा त्याबद्दल कमेंट करणे थांबवावे. माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर रोखण्यासाठी आणि कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करण्यासाठी योग्य कायदेशीर पावले उचलली जात आहेत. या कठीण काळात ज्यांनी मला पाठिंबा, सहानुभूती दाखवली, त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. तुमच्या दयाळूपणाने आणि विश्वासाने मला सर्वात जास्त गरज असताना सामर्थ्य दिले आहे," असे पायल धारे म्हणजेच पायल गेमिंग हिने लिहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Payal Gaming clarifies on MMS leak, says video is fake.

Web Summary : Payal Gaming addressed a viral MMS leak, clarifying the video is not her and likely a deepfake. She expressed distress over the misuse of her image and the ease with which reputations can be damaged online, urging people to stop sharing the content and support her legal actions.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल