Optical Illusion : डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. कारण या फोटोंच्या माध्यमातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच मेंदुला कन्फ्यूज करत असतात. कारण त्यात दिसतं ते कधीच नसतं. त्यांमध्ये काहीतरी रहस्य किंवा काहीतरी दडलेलं असतं. लोकांनाही या फोटोतील रहस्य सॉल्व करण्यात मजा येते. त्यामुळेच हे फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला खूपसारे पुस्तकं दिसतील, त्यात तुम्हाला एक वस्तू शोधायची आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं दिसत आहेत. ही पुस्तकं वेगवेगळ्य रंगांची म्हणजे निळ्या हिरव्या आणि लाल रंगांची आहेत. या फोटोकडे बारकाईने बघितलं तर तुम्हाला यात पुस्तकांशिवाय काहीच दिसत नाही. पण या फोटोमधील पुस्तकांच्या गठ्ठ्यात एक पेन्सिल लपवली गेली आहे. पण ती सहजपणे दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची तीक्ष्ण नजर वापरावी लागणार आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनाचं माध्यम तर आहेतच, सोबतच याद्वारे मेंदू आणि डोळ्यांची कसरतही चांगली होते. त्यामुळे हे फोटो खास ठरतात. सायकॉलिजीकली सुद्धा या फोटोंना खूप महत्व आहे. कारण यानं तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि फोकसही वाढतो. चला तर मग लागा कामाला.
या फोटोत पेन्सिल शोधण्यासाठी डोळ्यांवर फार जोर द्यावा लागणार आहे. अनेक लोकांनी यातील पेन्सिल शोधण्याचं काम केलं, पण ते यात फेल झाले. अनेक लोक तर म्हणाले की, या फोटोत पेन्सिल नाहीच. पण यात खरंच पेन्सिल आहे. तुम्हाला यात हिरव्या रंगाची पेन्सिल दिसेल. जी पुस्तकांमध्ये दबली आहे.