शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"आपलं काम करा, पगार घ्या अन् थेट घरी जा..."; IAS Officer ची 'ही' पोस्ट तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 13:14 IST

IAS Officer Awanish Sharan : आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतातील लाखो लोक रोज ऑफिसमध्ये जातात. दिवसभरातील सर्वात जास्त वेळ ते तिथेच घालवतात. याच दरम्यान ऑफिसमधील काही सहकारी हे चांगले मित्र होतात. तर काहींशी फक्त कामापुरतच बोललं जातं. काही लोकांचा ऑफिसमधला अनुभव वाईट असल्याने ते एकटंच राहणं पसंत करतात. अशातच आता सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. 

आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan)  यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर त्यांनी यावरून नेटकऱ्यांना तुम्ही सहमत आहात की नाही? असा प्रश्न देखील विचारला आहे. ‘Not Everyone At Your Workplace Is Your Friend… DO Your Job, Get Paid…Go Home… म्हणजेच ऑफिसमधील प्रत्येकजण हा तुमचा मित्र नसतो. फक्त आपलं काम करा. पगार घ्या आणि घरी जा…" असं म्हटलं आहे. 

अवनीश शरण यांचं हे ट्विट काही तासातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अनेकांनी या वाक्याला सहमती दर्शवली आहे. काही लोकांनी ही गोष्ट सत्य असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. या वाक्याशी मी सहमत नाही. कारण ऑफिस हे आपलं दुसरं घर असं म्हटलं आहे. 

एका युजरने नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत माझे काही मित्र झाले होते. पण गेल्या 18 वर्षात ऑफिसमध्ये माझा कुणीही मित्र झाला नाही असं सांगितलं आहे. आणखी एका युजरने या वाक्याशी मी सहमत आहे. कारण सहकाऱ्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि मैत्रीची भावना होते. पण परिस्थितीनुसार स्पर्धा, इर्श्या, उपहास, निंदा, चुगल्या आदी गोष्टी जोडल्या जातात असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल