शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हनीमूनला असताना झालं असं काही, पत्नी म्हणाली, "या व्यक्तीसोबत लग्न करून चूक केली..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:39 IST

वाचा हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या कपलसोबत नक्की काय घडलं...

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. परंतु जरा कल्पना करा, या दरम्यानही तुम्हाला ऑफिसमधून काही तातडीच्या कामाचं बोलावणं आलं तर कसे वाटेल? नक्कीच तुम्हाला एकतर काही सूचणार नाही किंवा राग येईल आणि तुमचा जोडीदारही नाराज होईल. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्याबाबतही असंच घडलं.

अमेरिकेत राहणार्‍या एका व्यक्तीने Reddit वर सांगितलं की, या वर्षी जानेवारीमध्ये आपण हनीमूनसाठी कंबोडियाला गेला होता. इतक्यात ऑफिसमधून बॉसचा फोन आला आणि त्यांनी काही तातडीच्या कामासाठी एक दिवस ऑफिसला यायला सांगितलं. हे ऐकून त्याला संताप आला. कारण तो हनीमूनसाठी सुट्टी घेऊनच कंबोडियाला आला होता. त्यावेळी त्याच्या बॉसनंच त्याच्या सुट्ट्या मंजूर केल्या होत्या.

बॉसच्या बोलावण्यानंतरही त्यानं ऑफिसला येण्यास नकार दिल्यानं त्याला बेजबाबदार कर्मचारी कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या Reddit पोस्टमध्ये, त्या व्यक्तीनं लिहिलं की, 'मी नुकतंच लग्न केलं आहे आणि आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कंबोडियाला आलो. मला आणि माझ्या पत्नीला अनेकदा कामातून वेळ मिळत नाही, त्यामुळे या सुट्ट्या आमच्यासाठी खूप खास होत्या. मी १ जानेवारीला रजेसाठी अर्ज केला होता, दुसऱ्याच दिवशी बॉसनं तो अर्ज मंजूरही केला.

"मीटिंगमध्ये सहभागी होण्यास सांगतायत""आता माझे बॉस मला तिसऱ्याच दिवशी एका क्लायंटसोबत पिच मीटिंगमध्ये सहभागी होण्यास सांगत आहेत. ही डील खुप आवश्यक आहे आणि ते केवळ एकाच दिवसासाठी मला यायला सांगत आहेत. परंतु मी हनीमूनसाठी सुट्टीवर आलो असून मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही असं सांगितलं. परंतु त्यांनी मला केवळ एकाच दिवसासाठी येण्यास सांगितलं आहे," असंही त्यानं पुढे लिहिलंय.

या प्रकरणी आपल्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर आता दोन निर्णयांमध्ये फसलो आहोत. जर गेलो नाही तर बॉस आपल्याला कामावरून काढेल, अन्यथा हनीमून रिप्लान करावा लागेल. दरम्यान, दुसरीकडे पत्नीनं आपण अशा व्यक्तीसोबत लग्न करून आपल्याला पश्चाताप होत असल्याचं म्हटलं. हा आपल्यासाठी एक कठीण काळ असल्याचंही त्यानं म्हटलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल