शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत महिलांनी रेल्वे रुळांशेजारीच मांडली चुल! 'Video' होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 13:33 IST

मुंबईच्या माहिम जंक्शन येथील रेल्वे स्थानकाच्या नजीक रेल्वे रुळाच्या बाजुला काही लोक जेवण बनवत असल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आलाय. 

Social Viral : सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही लोक काही ऐकत नाही. रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर करा, रेल्वे रूळ ओलांडू नका अशा सूचना रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वारंवार देण्यात येतात, मात्र त्याचे गांभीर्य लक्षात न घेता प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

मुंबईतील माहिम रेल्वे स्थानक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळाच्या शेजारी चुल पेटवून जेवण बनवणाऱ्या महिलांचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर माहिम जंक्शन रेल्वे स्थानकाजवळील एक  व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. या व्हायरल व्हिडीओवर फक्त नेटकऱ्यांनीच नाहीतर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये माहिम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळच असलेल्या ठिकाणी काही महिला जेवण बनवताना दिसत आहेत. त्याव्यतिरिक्त काही लहान मुलं सैरा-वैरा रेल्वे रुळांवरून धावताना दिसत आहेत. काही जण तर बिनधास्तपणे रेल्वे रुळाच्या बाजुला झोपलेले दिसतायत

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने या व्हिडीओची तातडीने दखल घेत संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ २४ जानेवारीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ जवळपास १८ हजार वेळा पाहिला गेला आहे आणि 'माहीम जंक्शन येथे रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान' असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

येथे पाहा : 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrailwayरेल्वे