शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी आईच ती! बाळाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात; थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:13 IST

एक आई आपल्या मुलाचा अपघातापासून जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते. 

आई आपल्या मुलांसाठी सर्वकाही करते. जेव्हा जेव्हा मुलांवर संकट येते तेव्हा ती ढाल बनून संकटासमोर उभी राहते. धोका कितीही मोठा असला, स्वतःचा जीव गमवावा लागला तरी आई आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करते. सध्या सोशल मीडियावर आईशी संबंधित एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एक आई आपल्या मुलाचा अपघातापासून जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन रस्त्याच्या कडेला चालत आहे, त्याच दरम्यान तिला समोरून एक भरधाव वेगात कार येताना दिसते. ती त्याला पाहून थांबते, पण कार मालक भरधाव वेगाने येतो आणि त्यांना धडकतो. याच दरम्यान, आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते, तिला गाडीची जोरदार धडक बसते. 

अपघातानंतरही महिलेला आपल्या मुलाची काळजी असते. ती पटकन जाऊन मुलाकडे पाहते. या धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @DoctorAjayita नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ 5 लाख 91 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये सांगितले आहे की, ही घटना यापूर्वी घडली होती आणि त्यात मुलाचा मृत्यू झाला होता. ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता, त्याला तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल