शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुपरमॉम! भिंत कोसळत होती अन् लेकरासाठी माय भिंत बनून उभी राहिली; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 19:25 IST

लेकराच्या संरक्षणासाठी आई सरसावली; विटा कोसळत असताना आई पहाडाप्रमाणे लेकरासाठी उभी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. आईच्या प्रेमाची, तिच्या जिव्हाळ्याची तुलना जगात कशासोबतही करता येत नाही. जग स्वार्थी आहे. पण आई नाही. कारण तिचं प्रेमच निरपेक्ष आहे. देवाला सगळीकडे जाता येत नाही. म्हणूनच त्यानं आई निर्माण केली. आईच्या प्रेमाची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

एखाद्या सुपरहिरोप्रमाणे आपल्या लेकराचं रक्षण करणाऱ्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लहानग्याच्या संरक्षणासाठी आईनं स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. भारतीय वन अधिकारी सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या जगाला मातांची गरज आहे, असं नंदा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. नंदा यांनी ट्विट केलेला व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

नंदा यांनी ट्विट केलेला व्हिडीओ १६ सेकंदांचा आहे. त्यात एक महिला तिच्या लहान मुलासह भिंतीला टेकून बसलेली दिसत आहे. मात्र अचानक तिला धोक्याची जाणीव होते. मागची भिंत पडणार असल्याचं तिच्या लक्षात येतं. ती कोसळणाऱ्या भिंतीला रोखण्याचा प्रयत्न करते. मात्र भिंत वेगानं कोसळू लागते. भिंतीतल्या विटा लेकरावर कोसळू नये म्हणून महिला भिंत बनून उभी राहते. कोसळणाऱ्या विटा महिलेवर पडतात. मात्र आई तिच्या लेकराला साधं खरचटू देत नाही. पुढच्या काही क्षणांत एक व्यक्ती तिथे येते. ती बाळाला कुशीत घेते. महिलादेखील उठून उभी राहते आणि ते तिथून निघून जातात.