शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कोरोनामुळे चिमुकल्याला कुशीतही नाही घेतलं; व्हिडीओ कॉलवर चेहरा पाहिला अन् तिनं प्राण सोडले

By manali.bagul | Updated: December 21, 2020 17:38 IST

Trending Viral News in Marathi : आपल्या  बाळात कुशीत घेण्याचे सुख सुद्धा या माऊलीला मिळाले नाही

कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या सगळ्यात जास्त केसेस अमेरिकेत दिसून आल्या. कोरोनामुळे अनेकांना गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागत आहे.  अजूनही कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. पण लसीकरण सुरू होण्याची सुरूवात होताच लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली दिसून येत आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे.

एका महिलेने आपल्या नवजात बाळाला जन्म देताच प्राण गमावले आहेत. आपल्या  बाळात कुशीत घेण्याचे सुख सुद्धा या माऊलीला मिळाले नाही.  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील रहिवासी असलेल्या वनेसा कार्डेनस  गोंजाजेस यांनी नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. ९ नोव्हेंबरला वनेसा यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळलं. असं म्हटलं जात आहे की, डिलिव्हरीदरम्यान बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

व्हिडीओ कॉलवर बाळाला पाहिलं

वेनिसाला कोरोनाचं संक्रमण झालंय हे कळताचं बाळाला वेगळं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर वेनिसा जास्त दिवस जगू शकल्या नाहीत. मरण्याआधी त्यांनी आपल्या चिमुकल्याला व्हिडीओ कॉलवर पाहिले होते. nbclosangeles.com च्या रिपोर्टनुसार  वेनिसा यांना कोरोना झाल्यानंतर बाळाला आईपासून लांब ठेवण्यात आलं  होतं. आता या चिमुरडयाचे बाबा त्याची काळजी घेत आहेत.

हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

वेनिसा यांना शेवटपर्यंत आशा होती की, त्या  कोरोनातून ठीक होतील आणि आपल्या बाळाला कुशीत घेऊ शकतील. पण काळाच्या मनात काही वेगळंच होतं. वेनिसा यांना जीव गमवावा लागला आणि या माय लेकाची भेट होऊ शकली नाही.  सोशल मीडियावर या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं जात आहे. अनेकांना चिमुरड्यासाठी वाईट वाटत आहे.  लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका