शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काय सांगता, पिंपळाला लागलाय आंबा? व्हिडीओ तुफान व्हायरल झाला अन् भलताच प्रकार समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 13:02 IST

निसर्गाचा चमत्कार म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

तुम्ही कधी पिंपळाच्या झाडावर आंबा पाहिलाय? नाही ना? पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पिंपळाच्या झाडावर आंबा लागल्याचा दावा व्हिडीओसोबत केला जात आहे. हा व्हिडीओ जवळपास दीड मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या ऋषीकेशमधील असल्याचा दावा आहे. ऋषीकेशच्या त्रिवेणी घाटाजवळ असलेल्या पोलीस चौकीजवळील पिंपळाच्या झाडावर तीन आंबे पाहिल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असा मजकूर व्हिडीओसोबत आहे.सोशल मीडियावर सध्या पिंपळाच्या झाडाच्या व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हॉट्स ऍप, ट्विटर, फेसबुक सगळीकडेच हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. पिंपळाच्या झाडाला आंबे हा चमत्कार असल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र सत्य वेगळं आहे. व्हायरल व्हिडीओसोबत केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पडताळणीत समोर आलं.  काही दिवसांपूर्वी या परिसरात वादळ आलं होतं. सोसाट्याचा वारा सुटल्यानं जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या काही फांद्या तुटल्या आणि त्या पिंपळाच्या फांद्यांमध्ये जाऊन अडकल्या. आंब्याच्या झाडाच्या तुटलेल्या फांद्यांना आंबे लागलेले होते. ते पिंपळाच्या फांद्यांवर अडकले. त्यामुळे पिंपळाला आंबे लागल्यासारखं चित्र दिसू लागलं. याचा व्हिडीओ काहींनी काढला आणि तो पुढे व्हायरल झाला.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पिंपळाच्या झाडावर आंबे लटकत असल्याचं चित्र दिसतं. त्यासोबतच त्यात एक होर्डिंग दिसत आहे. त्यावर 'श्री गंगा सभा' असं लिहिलं आहे. ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटाची देखभाल करण्याचं काम श्री गंगा सभा करते. त्यांच्याकडूच परिसरात आरती केली जात आहे. त्या होर्डिंगवर श्री गंगा सभेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल शर्मांचा फोन नंबर आहे. त्यांच्याशी एका हिंदी वृत्तवाहिनीनं संवाद साधला. तेव्हा पिंपळाच्या झाडाला आंबे लागल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.