शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हिंस्त्र चित्त्यांसोबत गळ्यात हात घालून आरामात झोपलाय हा माणूस, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:50 IST

हे जितक्या सहज घडतंय तितकं काही हे सहज आपल्याला वाटत नाही. व्हिडिओ पाहताना प्रत्येक क्षणाला आपली धडधड वाढत जाते. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला काही क्षणांसाठी हे खरचं घडतंय यावर विश्वास ठेवणंही कठीण होईल.

असं म्हणतात माणसाची मदत केली तर तो तुमचे उपकार विसरुन जाईल पण प्राण्यांना लळा लावला तर ते त्याहुनही जास्त प्रेम तुम्हाला देतील. मग प्राणी पाळीवच असले पाहिजेत असं गरजेच नाही आपण सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओज पाहतो ज्यात जंगली प्राण्यांनाही माणसांनी लळा लावलाय आणि ते तितक्याच प्रेमाने त्यांच्याशी वागतायत. टीव्हीवर तर याचे अनेक माहितीपटही तुम्ही पाहिले असतील. या डॉक्यूमेंट्रीजमध्ये हे प्राणी त्यांच्या मालकांच्या अंगावर अगदी खेळत, बागडत असतात. मात्र एक असा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय ज्यात तब्बल तीन चित्ते त्यांच्या मालकाला मिठी मारुन झोपले आहेत. हा व्हिडिओ कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याने इस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की रात्रीची वेळ आहे आणि एक माणूस चादर घेऊन झोपला आहे. त्याच्या बाजूला तीन चित्ते झोपले आहेत. त्यापैकी एका चित्त्याला थंडी वाजते. तो उठतो आणि मालकाच्या चादरीत येऊन झोपतो. त्या माणसाने त्या चित्त्याच्या गळ्यात पोटच्या लहान मुलाप्रमाणे हात घातलाय. त्यानंतर थोड्यावेळाने दुसरा चित्ता उठतो. त्यालाही कदाचित थंडी वाजत असते. तो मालकाच्या पायाजवळ येऊन झोपतो. मग तिसरा चित्ताही उठतो तो दोन चित्त्यांच्यामध्ये असलेल्या जागेत मालकाच्या कुशीत जाऊन झोपतो.

हे जितक्या सहज घडतंय तितकं काही हे सहज आपल्याला वाटत नाही. व्हिडिओ पाहताना प्रत्येक क्षणाला आपली धडधड वाढत जाते. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला काही क्षणांसाठी हे खरचं घडतंय यावर विश्वास ठेवणंही कठीण होईल. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत काही माहिती कॅप्शनमध्ये दिलेली नाही. पण हा व्हिडिओ पोस्ट करून एक दिवसही झाला नसेल तोच दिड लाखाच्या वर व्हिव्ज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकजण यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल