शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

Video - मेडिकल ऑफिसरने पतीसोबत सरकारी रुग्णालयातच DJ वर धरला ठेका; रुग्णांना झाला त्रास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:24 IST

Block Medical Officer Joya Khan : रुग्णालयात रुग्ण आणि गर्भवती महिला उपचारासाठी दाखल असतानाच मेडिकल ऑफिसर आपल्या पतीसोबत डीजेवर (DJ) थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील शहपुरा येथील सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्णालयात रुग्ण आणि गर्भवती महिला उपचारासाठी दाखल असतानाच मेडिकल ऑफिसर आपल्या पतीसोबत डीजेवर (DJ) थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. जबलपूर जिल्ह्यातील ब्लॉक मेडिकल ऑफिसर (BMO) झोया खान यांनी आपले पती इमरान खानसोबत कटरिना कैफ आणि सलमान खानच्या भारत या चित्रपटातील एका गाण्यावर जबरदस्त ठेका धरला. मात्र या घटनेनंतर आता अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. 

रुग्णालयात पेशंट दाखल असताना असं कसं घडू शकतं असं म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती असं वर्तन कसं काय करू शकतात, असा सवाल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर जिल्ह्यातील शाहपुरा ब्लॉक परिसरातील शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. ब्लॉक मेडिकल ऑफिसर झोया खान आणि तिचा पती इमरान खान एका हिंदी सिनेमातील गाण्यावर डान्स करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतं.

रुग्णालय परिसरातच डीजे लावण्यात आला असून त्यावर मोठ्यामोठ्याने गाणी सुरू होती आणि मेडिकल ऑफिसर या पतीसोबत नाचण्यात दंग होत्या. रुग्णालयातील सर्व स्टाफसाठी झोया खान यांनी पार्टीचं आयोजन केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी सर्व स्टाफसाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयातील सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. मोठमोठ्या आवाजातील डीजेच्या तालावर थिरकताना रुग्णालयात रुग्णही दाखल आहेत, ही बाब सगळेच जण विसरून गेल्याचं दिसत आहे. 

मेडिकल ऑफिसर झोया खान यांच्या पतीची रुग्णालयाजवळच पॅथोलॉजी लॅब आहे. त्याचं नियमित रुग्णालयामध्ये येणं-जाणं असतं. रुग्णालयाच्या स्टाफसोबत झोया खाननं आपल्या पतीलाही या पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांकडून या व्हिडिओवर टीका होत असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी याचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhospitalहॉस्पिटल