Bharat Me Layari : 'धुरंधर' सिनेमा आला आणि सगळ्यांनाच पाकिस्तानातील ल्यारी नावाच्या शहराची ओळख पटली. सिनेमा आल्यापासून तर या शहराचं नाव लोकांच्या डोक्यात फिट झालं. पाकिस्तानच्या कराचीमधील हे एक फार जुनं आणि गजबजलेलं शहर आहे. सिनेमात हे शहर गुन्हेगारी विश्व, गँगवॉर, राजकारणाचं केंद्र दाखवण्यात आलंय. पूर्वीपासूनच हे शहर याच गोष्टींसाठी ओळखलं जातं. खासकरून येथील गँगवॉर. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, ल्यारी फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतात देखील आहे.
धुरंधर सिनेमाची हवा अजून ओरसरी नाही, अशात एक नवा शब्द व्हायरल झालाय. तो म्हणजे 'भारतात लयारी'. याचा संबंध लोक थेट कराचीसोबत जोडत आहेत. पण या नव्या ट्रेंडचं सत्य आपल्या कल्पनेच्या फार वेगळं आणि इंटरेस्टिंग असं आहे.
आपल्याला माहीत नसेल, पण पाकिस्तानातील ल्यारी आपल्या गँगवॉरसाठी ओळखलं जातं, पण भारतातील ल्यारी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी. आपल्याला वाटेल की, हे भारतातही ल्यारी नावाचं एखादं शहर असेल. पण भारतातील ल्यारी हे खूप लोकं राहत असलेलं शहर नसून एक नदी आहे. या नदीला 'ताल-लियारी' असंही म्हणतात. ही नदी गुजरातच्या कच्छमध्ये वाहते. ती सुद्धा फक्त पावसाळ्यात.
ल्यारी ही नदी वर्षभर गायब असते, पण पावसाळ्यात वाहू लागते. इतरवेळी कोरडी पडलेली असते. हीच या नदीचा सगळ्यात मोठी ओळख आहे. या नदीची आणखी एक खासियत म्हणजे या नदीतील दगड. त्यांवर पाणी, हवा आणि काळानुसार पडलेल्या खुणा स्पष्टपणे दिसतात. या खुणा एखाद्या नॅचरल आर्टसारख्या भासतात.
हे ठिकाण गुजरातच्या भुजपासून ७० किलोमीटर दूर आहे. इथे धीनोधर हिल आहे. ज्याला ज्वालामुखी प्लग मानलं जातं. लयारीचं रूप वातावरणानुसार बदलत राहतं. पावसाळ्यात पाणी वाहू लागतं, नंतर नदी कोरडी पडते. सकाळी आणि सायंकाळी या सुकलेल्या नदीचा नजारा फारच मनमोहक असतो.
Web Summary : Inspired by the movie 'Dhurandhar', many know Pakistan's Lyari. But India has its own 'Lyari' – a seasonal river, 'Tal-Liari', in Gujarat's Kutch. Unlike Karachi's crime-ridden Lyari, India's Lyari is known for scenic beauty and unique rock formations during the monsoon season.
Web Summary : 'धुरंधर' फिल्म से प्रेरित होकर कई लोग पाकिस्तान के ल्यारी को जानते हैं। लेकिन भारत में अपना 'ल्यारी' है - गुजरात के कच्छ में एक मौसमी नदी, 'ताल-लियारी'। कराची के अपराध-ग्रस्त ल्यारी के विपरीत, भारत का ल्यारी मानसून के मौसम में सुंदर दृश्यों और अद्वितीय चट्टान संरचनाओं के लिए जाना जाता है।