Japan Viral Sock Video: भारतातील वेगवेगळे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील जीवन, मार्केट, जंगल आणि इतरही अनेक गोष्टी दाखवत असतात. काही गोष्टी तर इतक्या अनोख्या बघायला मिळतात की, सहजपणे विश्वासच बसत नाही. अशाच एका इन्फ्लुएन्सरचा एक जपानमधील व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सिमरन बलार जैन असं या तरूणीचं नाव असून तिनं जपानमधील रस्त्यांच्या स्वच्छतेची एक टेस्ट केली. सिमरननं व्हिडिओत दाखवलं की, कशाप्रकारे तिनं पांढरे सॉक्स घालून जपानच्या रस्त्यांवर चालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला जे दिसलं ते अवाक् करणारंच आहे.
व्हिडिओत बघू शकता की, सिमरननं आपले पायातले शूज काढून पांढरे सॉक्स घातले आणि नंतर शूज न घालताच ती जपानच्या रस्त्यांवर चालत आहे. काही वेळानंतर तिनं पायातील सॉक्स काढले आणि चेक केले. तर सॉक्स पूर्णपणे स्वच्छ होते. जणू तिनं ते वापरलेच नाहीत. यावरून हे दिसून येतं की, जपानमध्ये स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते. लोकही रस्त्यावर कचरा टाकत नाही.
सिमरनला हाती शूज घेऊन केवळ सॉक्स घालून रस्त्यावर चालताना पाहून आजूबाजूचे लोकही अचंबित झालेत. त्यांना तिचं असं चालणं विचित्र वाटलं. जेव्हा पायात केवळ सॉक्स घालून रस्त्यांवर चालते, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना हे अजब वाटतं. त्यानंतर तरूणी काही अंतर चालून परत येते आणि सॉक्स चेक करते तर ते स्वच्छ असतात. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सही अवाक् झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @simranbalarjain नावाच्या अकाऊंटवर पोस्टकरण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला तिनं लिहिलं की, "मी नुकतेच नवीन सॉक्स विकत घेतले आणि ते घालून जपानच्या रस्त्यांवर चालले. जर जपान खरंच जगातील सगळ्यात स्वच्छ देश असेल तर माझे सॉक्स खराब होणार नाहीत".
या व्हिडिओला आतापर्यंत २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाख ८९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेक यूजर्सनी कमेंट्स करत जपानमधील लोकांचं कौतुक केलं आहे.