शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विराट-हार्दिकची नेट्समध्ये धम्माल मस्ती, Video पाहून तुम्हालाही नक्कीच येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:11 IST

Virat Hardik Fun: पहिल्या वन डे साठी नेट्समध्ये सराव सुरू असतानाचा व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli Hardik Pandya Fun Video, IND vs WI 1st ODI: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमधील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बार्बाडोस येथे होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. भारतीय वन डे संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेटमध्ये सराव करताना आणि जोरदार गोलंदाजी करताना दिसला. नेटमध्ये हार्दिक पांड्यानेविराट कोहलीलाही गोलंदाजी दिली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे, विराटने हार्दिकच्या बॉलवर 'चाबूक शॉट' मारल्याचे दिसून येते. हे पाहून हार्दिक थोडा निराश होते आणि पुन्हा गोलंदाजी करायला वळतो. हार्दिक पुन्हा लाइन अपमध्ये परतताच विराट हार्दिकला चिडवताना दिसतो आणि भन्नाट नाचताना दिसतो. विराट कोहलीचा सराव दरम्यान हार्दिकसोबत मस्ती करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. पाहा व्हिडीओ-

हार्दिक संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणार आहे. भारतीय संघासाठी तो फलंदाजी सोबतच गोलंदाजीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या काही महिन्यांपासून तो संघाचा उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहे. तसेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा संघात नेतृत्व देखील केले आहे. विंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी हार्दिक संघाचा भाग नव्हता. त्यामुळे भारतासाठी दौरा खूप आधीच सुरू झाला असला तरी हार्दिकसाठी हा दौरा आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.

टॅग्स :India vs West Indiesभारत विरुद्ध वेस्ट इंडिजVirat Kohliविराट कोहलीhardik pandyaहार्दिक पांड्याSocial Viralसोशल व्हायरल