कुठली समस्या चर्चेत आली की, सोशल मीडियावर त्यावर नेहमीच मजेशीर उपाय सूचवले जातात. मीम बनवले जातात. अशाच एका समस्येवरून एक फोटो व्हायरल झाला आहे. तो म्हणजे ट्रॅफिकमध्येही ऑफिस मीटिंग! सध्या बंगळुरूमध्ये ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. ती इतर शहरातही वाढली आहे, पण या ट्रॅफिकमुळे ऑफिसला पोहोचायला उशीर होत असल्याने मीटिंग चुकतात. यावर एक फोटो शेअर करत एका व्यक्तीने नवीन आयडिया सुचवली आहे. त्यावर मजेशीर कमेंट्सही लोकांनी केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महानगरातील वाढती वाहतूक कोंडी प्रमुख समस्या बनू लागली आहे. बंगळुरूमध्येही नोकरदारांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. त्यावर सोशल मीडियातून व्यंगात्मक पद्धतीने भाष्य केले जात आहे.
फोटोची का होतेय इतकी चर्चा?
ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरही ऑफिस मीटिंग करण्यासाठी एक कल्पना एका व्यक्तीने मांडली आहे. आदर्श नावाच्या एका व्यक्तीने एक फोटो शेअर केला. ज्यात एका मालवाहू रिक्षात खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्यातील एका खुर्चीवर एक व्यक्तीही बसलेली आहे.
हा फोटो शेअर करत आर्दशने म्हटले आहे की, 'बंगळुरू ट्रॅफिक मीटिंग आयडिया.' हा फोटो बघून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
एकाने म्हटले आहे की, 'शार्क टँकसाठी पुढची स्टार्टअप आयडिया आहे, वर्क फ्रॉम ट्रॅफिक. मोठ्या ग्रुपसाठी हे ट्रक किंवा ट्रेलरमध्ये तयार केले जाऊ शकतं.'
दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'यातून तर नफा मिळवून व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, फक्त याबद्दल विचार करण्याची गरज आहे.' 'हे खरंच असं बनवलं गेलं, तर कोणालाच मीटिंगसाठी उशीर होणार नाही', असं एका यूजरने म्हटलं आहे.