शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वाहन पूजेसाठी नवीन हेलिकॉप्टर घेऊन व्यावसायिक पोहोचला थेट मंदिराजवळ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 22:55 IST

Helicopter Vahan Puja : हैदराबादमधील एका व्यावसायिकाने आपल्या नवीन खासगी हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी ते मंदिराजवळ आणले.

हैदराबाद :  भारतात बरेच जण नवीन वाहन खरेदी केले तर त्याची पहिल्यांदा पूजा (Vahan Puja) करतात. नवीन गाडी घेतल्यानंतर अनेक जण वाहन पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली भारतातील ही पंरपरा आजही कायम आहे. पण, आतापर्यंत आपण वाहने पूजा करण्यासाठी मंदिरासमोर आणल्याचे पाहिले असेल. मात्र, एका व्यक्तीने चक्क हेलिकॉप्टरची पूजा ( Helicopter Vahan Puja ) करण्यासाठी ते थेट मंदिराजवळ आणले. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चर्चा सुरू आहे.

हैदराबादमधील एका व्यावसायिकाने आपल्या नवीन खासगी हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी ते मंदिराजवळ आणले. बोनीपल्ली श्रीनिवास राव असे या व्यावसायिकाचे नाव आहे. बोनीपल्ली श्रीनिवास राव यांनी आपले हेलिकॉप्टर मंदिरात पूजेसाठी आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोनीपल्ली श्रीनिवास राव हे प्रथिमा ग्रुपचे मालक आहेत. त्यांनी आपले नवीन हेलिकॉप्टर ACH-135 वाहन पूजेसाठी यादद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराजवळ आणले होते. यावेळी त्यांनी पुजाऱ्यांमार्फत हेलिकॉप्टरची विशेष पूजा करुन घेतली. या हेलिकॉप्टरची किंमत जवळपास 47 कोटी इतकी आहे.

दरम्यान, भारतात कोणतीही नवीन वस्तू किंवा गाडी घेतली, तर त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच, नवी गाडी घेतल्यानंतर वाहन पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. मात्र, हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी ते थेट मंदिराजवळ घेऊन जाण्याची पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, ट्विटरवर हा व्हिडिओ lateefbabla यांनी पोस्ट केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल