शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या खुर्च्या आणि टेबलवरील चिव्वट डाग लगेच होतील दूर, लगेच करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:10 IST

Cleaning Tips : आज आम्ही तुम्हाला या खुर्च्यावरील डाग दूर करून त्या पुन्हा नव्यासारख्या करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

Cleaning Tips : बऱ्याच घरांमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या बघायला मिळतात. या खुर्च्या हलक्या असल्याने कुठेही सहज हलवता येतात. महत्वाची बाब म्हणजे या खुर्च्या स्वस्त आणि मजबूत असतात. पण कालांतराने या खुर्च्यांवर काळे डाग लागतात. हे डाग धूळ, माती, तेल कशाचेही असतात. जे साफ करणं फारच डोकेदुखीचं काम असतं.

जर खुर्च्या पांढऱ्या, लाल, निळ्या रंगाच्या असतील तर हे डाग आणखीनच दिसून पडतात. जे घरी पाहुणे आल्यावर बरे दिसत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला या खुर्च्यावरील डाग दूर करून त्या पुन्हा नव्यासारख्या करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

बेकिंग पावडर 

बेकिंग पावडर हे समस्यांवरील रामबाण उपाय आहे. प्लास्टिकच्या खुर्च्यांवरील डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि मिठाचा वापर करू शकता. यासाठी आधी खुर्च्यांवर कोरडा बेकिंग सोडा काही वेळासाठी टाकून ठेवा. नंतर स्पंज थोडा ओला करून त्याने डाग घासा. नंतर पाण्याने खुर्ची धुवून घ्या. डाग दूर झालेले दिसतील.

विनेगर आणि पाणी

जर खुर्च्यांवर बुरशी लागली असेल तर तुम्ही विनेगर आणि पाण्याचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये तयार करा. यासाठी बॉटलमध्ये 25 टक्के पाणी 75 टक्के विनेगर टाका. हे मिश्रण खुर्च्यांवर टाका. 10 मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर खुर्च्या घासून स्वच्छ करा व पाण्याने धुवून घ्या.

लिंबाचा रस

जर तुमच्याकडे व्हाईट विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता. लिंबामध्ये अ‍ॅसिड असतं. खुर्च्या क्लीन करण्यासाठी थोड्या डिटर्जेंट पावडरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. आता ही पेस्ट खुर्च्यांच्या चिव्वट डागांवर काही वेळ लावून ठेवा. नंतर हलक्या ओल्या स्पंजच्या मदतीने डाग घासा आणि नंतर खुर्च्या पाण्याने धुवून घ्या.

टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सSocial Viralसोशल व्हायरल