शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शोरुममध्ये गप्पा मारत असताना खिशातल्या मोबाईलमधून अचानक निघू लागला धूर; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:56 IST

गुजरातमध्ये घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पाटन: मोबाईलमध्ये स्फोट झाल्याच्या घटना वारंवार समोर येतात. आता गुजरातमधील पाटन येथील एका शोरूममधील एक व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती गप्पा मारत असताना त्याच्या खिशातील मोबाईलमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानं लगेच मोबाईल खिशातून काढून फेकला. हा संपूर्ण दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पाटनमध्ये असलेल्या एका शोरुममध्ये एक व्यक्ती बसला होता. तो अगदी आरामात बसून गप्पा मारत होता. त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलमधून अचानक धूर निघू लागला. घाबरलेल्या व्यक्तीनं मोबाईल लगेच खिशातून काढला जमिनीवर फेकला. त्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलमधून धूर निघत असल्याचं वेळीच संबंधित व्यक्तीच्या लक्षात आल्यानं अनर्थ टळला.

मोबाईलमधून येणारा धूर आणि त्यानंतर झालेला स्फोट सीसीटीव्हीत कैद झाला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. याआधी असाच एक व्हिडीओ एप्रिलमध्ये व्हायरल झाला होता. तो चीनमधील होता. अतिशय गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीच्या बॅगमध्ये असलेल्या मोबाईलला आग लागली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.