शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मंडपातच नवऱ्याला फरफटत नेत धु-धु धुतला; कारण ऐकून लोकांनी कौतुक केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:33 IST

जवळपास दीड मिनिटांचा हा व्हिडीओ व्हायरल होत होत आहे. ज्यात नवरीच्या येथील काही लोकांनी नवऱ्याला फरफटत नेत मारहाण केली

नवी दिल्ली – दिल्लीनजीक असलेल्या गाझियाबाद येथील साहिबाबाद येथे रात्री एका नवरदेवाला बेदम चोप देण्यात आला आहे. नवऱ्याला मारहाण करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नात नवरीच्या गळ्यात हार घालण्यापूर्वीच काही लोकांनी व्यासपीठावर येत नवऱ्याला फरफटत नेत मारहाण केली आहे. घडलेल्या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. मात्र जेव्हा खरं समोर आलं तेव्हा लोकांनी म्हटलं हे योग्यच आहे.

नवऱ्याच्या घरातले करत होते बचाव, नवरीकडील मंडळी करत होते मारहाण

जवळपास दीड मिनिटांचा हा व्हिडीओ व्हायरल होत होत आहे. ज्यात नवरीच्या येथील काही लोकांनी नवऱ्याला फरफटत नेत मारहाण केली. नवऱ्याचे नातेवाईक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. लग्नाच्या वेळी नवऱ्याच्या वडिलांनी १० लाख रुपये हुंडा देण्याची अट नवरीच्या कुटुंबाकडे केली. त्याचसोबत जर हे पैसे मिळाले नाहीत तर लग्न होणार नाही अशी धमकीही नवरीच्या कुटुंबाला दिली.

मात्र लग्नाआधीही मुलीच्या घरच्यांनी नवऱ्याकडच्या मंडळींना ३ लाख कॅश आणि १ लाखाची हिऱ्याची अंगठी दिली होती. परंतु इतकाच हुंडा नको असल्याने नवऱ्याच्या कुटुंबाचे मन भरलं नाही. त्यांनी लग्नातच १० लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या घरच्यांनी अथक प्रयत्न केले तरीही नवऱ्याकडील माणसांनी काहीच ऐकून घेतले नाही. त्यानंतर मुलीकडील माणसं संतापली त्यांनी नवऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र ही कहानी इथेच संपली नाही. तर नवऱ्याची सगळी पोलखोल झाली.

मुलीच्या घरच्यांनी दावा केला की, या नवऱ्याने याआधीही २-३ लग्न केली होती. मुलीच्या घरच्यांनी त्याचे फोटोही सर्वासमोर उघड केले. आरोपी नवरदेवाचं नाव मुज्जमिल आहे जो आग्रा इथं राहतो. मॅरेज हॉलमध्ये आरोपी नवऱ्याला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी योग्यच केले असं म्हटलं आहे. मात्र ही पहिलीच घटना नाही तर देशात अनेकदा अशा घटना समोर आल्या. दारु पितो म्हणून मारहाण करत लग्न मोडल्याची बातमी आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल