शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Girlfriends Prank On Boyfriend: गर्लफ्रेंडला भारी पडला ब्रेकअपचा प्रँक; बॉयफ्रेंडचा रिप्लाय पाहून हवेतच उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:18 IST

Relationship Prank: प्रेयसीने  'ब्रेकअप सॉन्ग' ची लाईन लिहून प्रियकराला मेसेज केला. हा मेसेज वाचून बॉयफ्रेंडही काही वेळ हबकला होता. टॅक्सी पकडून तो तिच्या घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होता. 

एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचा प्रँक केला. तिला तिचा प्रियकर किती प्रेम करते हे पहायचे होते. यासाठी तिने त्याला ब्रेकअप करत असल्याचा मेसेज केला. मात्र, ही गंमत तिच्यावरच उलटली, जेव्हा त्या प्रियकराने तिला सत्य सांगितले. टिकटॉक स्टार असलेल्या या तरुणीने ही गोष्ट सांगितली आहे.

प्रेयसीने  'ब्रेकअप सॉन्ग' ची लाईन लिहून प्रियकराला मेसेज केला. मला दुसरा बॉयफ्रेंड मिळाला आहे, मला माझ्या मार्गाने जायचे आहे. आपल्यातले नाते मला संपवायचे आहे, असे तिने मेसेजमध्ये म्हटले. हा मेसेज वाचून बॉयफ्रेंडही काही वेळ हबकला होता. त्याच्या पायाखालची वाळू सरकली होती. टॅक्सी पकडून तो तिच्या घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होता. 

तेवढ्यात त्याने प्रेयसीला मेसेज करत काय झाले? याचा अर्थ काय? असे विचारले. यावर प्रेयसीने 'हे सांगणे खूप अवघड आहे, पण मला तेच करावे लागेल जे माझ्यासाठी चांगले आहे. मला आता पुढे जायचे आहे.' असे सांगितले. यावेळी बॉयफ्रेंट टॅक्सी बुक करत होता. तेव्हा हा मेसेज आला. यावर बॉयफ्रेंडने तिला '' तुला तिने (दुसऱ्या गर्लफ्रेंडने) मी तुला धोका दिल्याचे सांगितले का?'' असा सवाल केला. 

प्रियकराच्या या एका ओळीने तरूणीचे होश उडाले. प्रियकरासोबत ब्रेकअप करण्यावर चेष्टा करणार्‍या मुलीला त्याच्याकडून दुसर्‍या मुलीबद्दल ऐकून धक्काच बसला. त्याची चेष्टा करण्याचा डाव अचानक उलटला. मात्र, पुढच्याच क्षणी प्रियकराचा आणखी एक मेसेज मोबाईलवर येऊन धडकला अन त्या तरुणीचा जीव भांड्यात पडला. हा मेसेज होता, कसा वाटला मझा रिव्हर्स प्रँक?. याबाबत या तरुणीने दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट