शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:14 IST

एका परदेशी व्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने एका मेहनती भारतीयाला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे.

भारत आपली संस्कृती, वारसा, सुंदर लोक आणि अतुलनीय आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. अनेक परदेशी व्लॉगर भारतात येतात आणि येथील अनोख्या गोष्टी पाहून आश्चर्यचकित होतात. एका परदेशी व्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने एका मेहनती भारतीयाला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे. ही गोष्ट आहे एका कष्टाळू व्यक्तीची ज्याने आपल्या मेहनतीने सर्वांचं मन जिंकलं.

निक नावाच्या व्लॉगरने हा व्हिडीओ शेअर केला आहे."मला प्रेरणा मिळावी म्हणून मी प्रवास करतो. @shashisahana41ही व्यक्ती  जगाला प्रेरणा देत आहे. एका उत्तम जीवनासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात आणि या व्यक्तीचे कठोर परिश्रम अतुलनीय आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. आता मी आयुष्याला गृहीत धरणार नाही. धन्यवाद भाऊ." 

"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. निकची भेट शशीशी झाली, जो बंगळुरूमध्ये एक रिक्षा चालक आहे आणि तो दिव्यांग आहे. तरीसुद्धा शशी रिक्षा चालवतो आणि निकला शहरात फिरवून आणतो. शशीची मेहनत आणि धाडस पाहून निक भावुक झाला. 

"तू खूप मजबूत आहेस. तुला आणखी बळ मिळो" असं म्हटलं आहे.  शशीने कधीही त्याची कमजोरी त्याच्या मार्गात येऊ दिली नाही. तो कठोर परिश्रमाने आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि आपलं काम करतो. त्याची गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि लोकांच्या मनाला स्पर्शून गेला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ