शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जबरा फॅन! मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी केल्या ११ सर्जरी, २१ लाख रूपये केले खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:04 IST

'किंग ऑफ पॉप' मायकल जक्सन हा गेल्यावरही त्याच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली दिसत नाही. उलट त्याचे फॅन्स वाढतच आहेत.

'किंग ऑफ पॉप' मायकल जक्सन हा गेल्यावरही त्याच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली दिसत नाही. उलट त्याचे फॅन्स वाढतच आहेत. आजही लाखो फॅन्स त्याचासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात. असे अनेक चाहतेही आहेत जे त्याच्यासारखे दिसतातही. त्यातील एक आहे लिओ ब्लॅंको. २२ वर्षीय लिओने असं काही केलं आहे की, यामुळे तो मायकल जॅक्सनसारख्या कित्येक चेहऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. लिओने गेल्या ७ वर्षात मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी स्वत:वर २१ लाख रूपयांपेक्षाही जास्त रक्कम खर्च केली आहे. 

मायकल जॅक्सनचे फॅन्स असेच आहेत. ते काहीही करतात. लिओ मायकलचा बालपणापासून मोठा फॅन आहे. १५ वर्षाचा झाला असतानाच त्याने ठरवले होते की, त्याला मायकल जॅक्सनसारखं दिसायचं आहे. गेल्या ७ वर्षात त्याने एक दोन नाही तर चक्क ११ प्लास्टिक सर्जरी केल्यात. तो अजूनही थांबला नाहीये, त्याला अजूनही वाटतं की, तो स्वत:मध्ये काही बदल करू शकतो. 

लिओने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी गेल्या ७ वर्षात प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिकसारख्या प्रक्रियांमध्ये ३० हजार डॉलर इतका खर्च केलाय'. भारतीय मुद्रेत ही रक्कम २१ लाख २७ हजार इतकी होते. 

मायकल जॅक्सनसाठी लिओचं हे वेड पाहून त्याचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. पण त्याच्या घरचे लोक यामुळे जरा त्रासलेले आहेत. 

सर्जरी आणि कॉस्मेटिक प्रोसेसच्या माध्यमातून लिओने स्वत:त अनेक बदल केले आहे.  आता तो मायकल जॅक्सनचा डुप्लिकेट वाटतो तर आहे. पण त्याला काही बदल करण्याची गरज आहे. यासाठी तो आणखी प्रयत्न करणार आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्