शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नदीत बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धावत आला हत्ती आणि मग....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 10:58 IST

Elephant Saves Man Life From Drowning: असं क्वचितच बघायला मिळतं की, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी एखादा प्राणी धावत आला. असं श्वानाबाबत बघायला मिळतं. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे.

Elephant Saves Man Life From Drowning: जेव्हाही एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असतो तेव्हा काही लोक मदतीसाठी धावत येतात. इतकंच नाही तर जेव्हा एखादा प्राणी  रहिवाशी भागात अकडतो तेव्हा त्याच्या मदतीसाठी लोक समोर येतात. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असं क्वचितच बघायला मिळतं की, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी एखादा प्राणी धावत आला. असं श्वानाबाबत बघायला मिळतं. मात्र, अशीच एक घटना समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडीओत हेच बघायला मिळतं. व्हिडीओत दिसणारं हत्तीचं पिल्लू संवेदनशील आहे. व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्ती नदीच्या पाण्यात बुडताना दिसत आहे आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे. दरम्यान हत्तींचा एक कळप नदी पार करण्याच्या प्रयत्नात तिथेच आहे. याच कळपातील एका हत्तीच्या पिल्लाला नदीत वाहून जाणारी व्यक्ती दिसते आणि त्याचा जीव वाचण्यासाठी हे हत्तीचं पिल्लू वाहती नदी क्रॉस करून येतं. व्यक्तीला ते सोंडेने बाहेर काढतं आणि ओढत किनाऱ्यावर नेतं.

हत्तीने आधी त्याला आपल्या सोंडेत पकडण्याचा प्रयत्न केला, नंतर व्यक्तीनेच हत्तीची सोंड पकडली. व्यक्तीला सोंडेत पकडता येत नसल्याचं लक्षात येताच हत्ती त्याला पायाने बाहेर ढकलतो. हा व्हिडीओ @BenGoldsmith नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 73 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओला 9 हजार लाईक्स आणि अडीच हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके