शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

Viral Video: काकांनी नाचता नाचता लावली लग्नमंडपात आग, पुढे जे केलं ते त्याहुनही भयानक...पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 10:49 IST

एका व्यक्तीने नाचता नाचता पार्टीत खरोखर आग लावली (Guest Sets Fire at Party). त्यानंतर आग विझवण्यासाठी व्यक्तीने जे केलं तेसुद्धा धक्कादायक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पार्टी म्हटलं की मजामस्ती, डान्स आलाच. काही लोक पार्टीमध्ये डान्स किंवा डीजे फ्लोअरवर आग लावतात. म्हणजे आपल्या डान्सने सर्वांना इम्प्रेस करतात. पण एका व्यक्तीने नाचता नाचता पार्टीत खरोखर आग लावली (Guest Sets Fire at Party). त्यानंतर आग विझवण्यासाठी व्यक्तीने जे केलं तेसुद्धा धक्कादायक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Fire video viral).

कार्यक्रम असो वा पार्टी काही लोक त्यात इतके दंग होतात की ते काय करत आहेत, याचं भानही त्यांना राहत नाही आणि मग यातूनच भयंकर दुर्घटना घडते. अशीच ही व्यक्ती आहे, जिच्यामुळे पार्टीत आग लागली. तुम्ही पाहू शकता हा एखाद्या लग्नाच्या पार्टीचा व्हिडीओ आहे, असंच दिसतं. इथं लोक आपल्या दोन्ही हातात फुलबाज्या घेऊन आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

एक व्यक्तीही हातात पेटवलेल्या फुलबाज्या घेऊन हॉलमधून बाहेर नाचत नाचत येते. एका महिलेजवळ ती उभी राहते. दुसरी एक व्यक्ती त्यांचा व्हिडीओ बनवते आहे. कॅमेऱ्याकडे पाहताच या व्यक्तीला आणखी उत्साह चढतो. ती आणखी जोशात नाचू लागते.

तिच्या डाव्या बाजूला सुकलेलं झाड आहे. नकळतपणे व्यक्तीच्या डाव्या हातातील फुलबाजी त्या झाडाला लागते आणि झाड पटते. आग लागताच सर्वजण घाबरतात आणि ओरडू लागतात. सर्वांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू होते. आगीपासून सर्वजण दूर पळतात. पण ज्या व्यक्तीमुळे आग लागली ती अगदी शांत दिसत आहे. ती स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न करते. आधी आगीत हात टाकते. हातांनी आग विझवू लागते. त्यानंतर झाड जमिनीवर पाडून पायांनी आग विझवते. आग पूर्णपणे विझल्यानंतरही व्यक्तीचं नाचणं काही थांबत नाही. काहीच झालं नाही अशी ती व्यक्ती नाचू लागते.

@ThomasMightSnap ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्यक्तीचा अॅटीट्युट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया