शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मृत्यूनंतर २० मिनिटांहून जास्त रडू नका, थोडीशी घेऊनच या; महिलेची अखेरची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:26 IST

या महिलेचा व्हिडिओ ४३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न आणि अपेक्षा असतात. आयुष्य जगण्यासाठी त्या असायलाच हव्यात. परंतु जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात अखेरची इच्छा ही भावूक गोष्ट आहे. लंडनच्या एका महिलेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या महिलेने तिची अखेरची इच्छा काय आहे हे बोलून दाखवलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत तिने म्हटलंय की, तिच्या मृत्यूनंतर कोणीही २० मिनिटांपेक्षा जास्त रडू नये आणि थोडे प्यायल्यानंतर या. मेकअपच्या वस्तू शवपेटीमध्ये ठेवाव्यात. लंडनच्या या महिलेची शेवटची इच्छा ही महान कवी हरिवंशराय बच्चन यांच्या अमर कृती मधुशालामध्ये निर्मित झालेल्या शेवटच्या इच्छेसारखीच आहे. या महिलेचा व्हिडिओ ४३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे. स्त्रीची शेवटची इच्छा कितपत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे, कारण ती अंमलात आणण्यासाठी कोणतीही कायदेशीर किंवा सामाजिक सक्ती नाही. तिचे कुटुंबीय त्याला कितपत स्वीकारतील किंवा त्याची पूर्तता करतील, हेही आता सांगणे कठीण आहे. कदाचित ही इच्छा धुळीलाही मिळेल. मात्र, या महिलेला तिच्या मृत्यू आणि अंत्यसंस्कारावर काय हवे आहे हे तिनं सांगितले आहे. अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तिने कोणते नियम जाहीर केले आहेत जाणून घ्या.

ही आहे महिलेची शेवटची इच्छा

तुम्ही अंत्यसंस्काराला उपस्थित आहात याची ओळख पटवण्यासाठी नवीन किंवा जुना फोटो आयडी आणा.

मेकअपच्या वस्तू म्हणजे फाउंडेशन, लिपस्टिक, सूरमा इत्यादी शवपेटीमध्ये ठेवाव्यात.

सर्वांनी च्युइंगम खा, जरी मी त्यावेळेला नसले तरी माझ्या अखेरच्या इच्छेचा आदर करा.

अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रंगीबेरंगी कपडे परिधान करून या.

अंत्ययात्रेवेळी अन्न हाताने बनवावे.

अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहणाऱ्यांनी दोन पॅग दारू घेऊन यावे लागेल. जे कमी पितात त्यांनी घरी परत जावे.

कोणालाही २० मिनिटांपेक्षा जास्त काळ रडण्याची परवानगी नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल