शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या अन् मगरीच्या फाईटमध्ये कुत्रा जिंदाबाद! केले असे काही, की मगरीनेच काढला पळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:06 IST

एक कुत्रा मगरीच्या जबड्यातून अगदी सहज बाहेर पडलाय. खरंतर मगरीन त्याला आपल्या जबड्यात पकडलेलंच पण कुत्र्यानं असं काही केलं की मगरीने स्वत: हुनच त्याला जबड्यातून सोडलं आणि धूम ठोकली....

मगर हा अत्यंत हिंस्त्र प्राणी आहे. एकदा का मगरीने कुणाला जबड्यात पकडले तर त्या प्राण्याचा जीव गेलाच म्हणून समजा. पण एक कुत्रा मगरीच्या जबड्यातून अगदी सहज बाहेर पडलाय. खरंतर मगरीन त्याला आपल्या जबड्यात पकडलेलंच पण कुत्र्यानं असं काही केलं की मगरीने स्वत: हुनच त्याला जबड्यातून सोडलं आणि धूम ठोकली.

व्हिडीओत पाहू शकता पाण्याच्या किनाऱ्याजवळ एक कुत्रा उभा आहे. तो पाण्याकडे निरखून पाहतो आहे. त्याला पाण्यात हालचाल दिसून येते. पाण्यातून आपल्या दिशेनं काही तरी येत असल्याचं दिसतं. तो तिकडे टक लावून पाहत असतो आणि सावध होतो. एखादा मासाच असावा असं त्याला वाटतं आणि तो शिकारीच्याच तयारीत असतं. इतक्यात पाण्यातून त्याच्या दिशेने येणारा प्राणी डोकं वर काढतो हा प्राणी म्हणजे मासा नव्हे तर चक्क मगर असते.

मगर कुत्र्याला आपल्या जबड्यात घेण्यासाठी पाण्यातून डोकं वर काढतं पण ती आपला जबडा उघडणार त्याआधीच शिकारीच्या तयारीत असलेला कुत्रा मगरीचा जबडा आपल्या तोंडात घेतो. मगर कुत्र्याच्या तोंडातून सुटण्यासाठी धडपडू लागते. ती कुत्र्याला पाण्यात खेचते. पाण्यात जाताच कुत्रा मगरीला आपल्या जबड्यातून सोडतो.  हे पाहताच आजूबाजूचे लोकही तिथं धावत येतात. मगर पाण्यात गायब होते आणि कुत्रा सुद्धा पोहोत पोहोत दुसऱ्या किनाऱ्यावर येताना दिसतो. 

द डार्क साइड ऑफ नेचर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओ शेअर केल्याच्या काही क्षणांतच तो व्हायरल झाला आहे. अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल