शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

'बचपन का प्यार' गाणाऱ्या सहदेवला खरंच मिळाली २३ लाखांची कार? जाणून घ्या नेमका प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 12:18 IST

एमजी हेक्टर कंपनीनं सहदेवला २१ लाखांची कार भेट दिल्याची चर्चा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

छत्तीसगडमधील १० वर्षांच्या सहदेव दिर्दोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. सहदेवच्या 'बचपन का प्यार' गाण्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे. सहदेवचं गाणं इतकं लोकप्रिय होईल असा विचार कोणीही केला नव्हता. एका गाण्यामुळे सहदेव सोशल मीडियावर सुपरहिट झाला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीदेखील त्याची भेट घेतली. 

सहदेवचा आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच समोर आला. सहदेवला २३ लाख रुपयांची कार भेट देण्यात आल्याची चर्चा झाली. सहदेवचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सहदेव MG ZS EV facelift कारसमोर उभा आहे. सहदेवच्या शेजारी एमजी हेक्टरचे शाखा व्यवस्थापक दिसत आहेत. त्यांच्याकडून सहदेवचा सन्मान करण्यात आला आहे. 

या व्हिडीओत पुढे एमजी हेक्टर शोरूममधील सेल्सगर्ल सहदेवच्या हाती चावी देते. त्यामुळे सहदेवला एमजी हेक्टरकडून कार भेट देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसं काहीही घडलेलं नसल्याची माहिती आता पुढे आलेली आहे. सहदेवला कार नव्हे, तर २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'सहदेवला आम्ही कार दिलेली नाही. तर त्याला २१ हजारांचं बक्षीस देण्यात आलं,' असं एमजी कंपनीच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं. 

सहदेवच्या बचपन का प्यार गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रॅपर बादशाहनं बचपन का प्यारची एक सीरिज लॉन्च केली. त्यात सहदेव प्रमुख भूमिकेत आहे. यामध्ये बादशाहसह गायिका आस्था गिल आणि संगीतकार रिकोचा सहभाग आहे. सहदेवचं व्हायरल झालेलं गाणं  त्यानं २०१९ मध्ये गायलं होतं. त्यानं त्याच्या वर्गात हे गाणं गायलं. ते त्याच्या शिक्षकांनी चित्रीत केलं होतं.