शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

देसी जुगाड! पैसे खर्च न करता तयार केलं ट्रेडमिल, Anand Mahindra ही झाले फॅन; शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 09:46 IST

Desi Jugaad Video: एका व्यक्तीनं काहीही पैसे खर्च न करता किचनमध्ये ट्रेडमिलसारखा जुगाड केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Man Made Treadmill With Desi Jugaad: काही लोक खूप जुगाडू असतात, कधी कधी ते अशा गोष्टी बनवतात, ज्या पाहून सगळे थक्क होतात. अशी अप्रतिम क्षमता असलेले लोक कधी कारचे हेलिकॉप्टर करतात किंवा कधी एकही पैसा न खर्च करता एखादी गोष्ट तयार करू शकतात. असाच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एकही पैसा खर्च न करता किचनमध्ये ट्रेडमिलसारखा व्यायाम करण्यासाठी देसी जुगाड लावताना दिसत आहे. दिग्गज उद्योजक आनंद महिंद्राही या देसी जुगाड करणाऱ्या व्यक्तीचे फॅन झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती देशी जुगाडातून ट्रेडमिल कशी बनवते आणि त्याच्या मदतीने किचनमध्येच व्यायाम सुरू करते, हे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, ती व्यक्ती प्रथम स्वयंपाकघरात जाते आणि नंतर काही डिशवॉशिंग लिक्विड जमिनीवर ओतते, नंतर ते निसरडे करण्यासाठी जमिनीवर पाणी ओतते. पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती ट्रेडमिलवर ज्या प्रकारे धावतात तशी धावूही लागते. यासाठी व्यक्ती किचनच्या स्लॅबचा आधार घेताना दिसत आहे.

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अतिशय ॲक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल असल्याचेही म्हटले जात आहे. “जगातील सर्वात कमी किंमतीचा ट्रेडमिल आणि या वर्षीचा इनोव्हेशन अवॉर्डची ट्रॉफी यालाच मिळतेय,” असे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी दिलेय. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAnand Mahindraआनंद महिंद्रा