डेहराडूनच्या रायपूर भागात दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली भर रस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसल्या. एका मुलावरून हा वाद सुरू झाला. त्या दोन्ही तरुणी तो त्यांच्याच बॉयफ्रेंड असल्याचं म्हणत होत्या.
सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकींचे केस ओढताना आणि रस्त्यावर एकमेकींना मारताना दिसत आहेत. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले, मात्र दोघांनीही कोणाचंच ऐकले नाही.
एकाच बॉयफ्रेंडसाठी या दोन्ही मुली रस्त्यातच भिडल्या आणि एकमेकींच्या जीवावर उठल्या. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला मनोरंजन म्हणत आहेत तर काही जण ही लज्जास्पद घटना असल्याचं म्हणत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पोलीस मुलींवर गुन्हा दाखल करणार की नाही असा प्रश्न काहींनी विचारला. तर मुली मुलांपेक्षा कमी नाहीत असंही लोक म्हणत आहेत.