शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट फिव्हर, मित्रासाठी काय पण! नवरीसोबत भर मंडपात २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झाला करार आणि मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:06 IST

मॉर्डन जगात लग्नाआधी करार करणे हे काही नवीन नव्हे... त्यात अनेक अटी व शर्थी घातल्या जातात... तामिळनाडूच्या थेनी येथील एका प्राध्यापकाच्या लग्नात असाच एक करार झाला,

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज होतोय... बीसीसीआयने नुकतीच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. तत्पूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात आहेत.  भारतात क्रिकेटचं क्रेझ कितीय हे वेगळं सांगयला नको. त्यामुळेच लग्न मंडपातही क्रिकेटच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय केलेली अनेकदा पाहिली गेली आहे. अशाच एका क्रिकेट वेड्या मित्रांनी लग्नमंडपात २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नवरीसोबत करार करून घेतला अन् सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली..

मॉर्डन जगात लग्नाआधी करार करणे हे काही नवीन नव्हे... त्यात अनेक अटी व शर्थी घातल्या जातात... तामिळनाडूच्या थेनी येथील एका प्राध्यापकाच्या लग्नात असाच एक करार झाला, परंतु यात क्रिकेट फिव्हर होता. लग्नाआधी वर मुलग्याच्या मित्रांनी नवरी मुलीकडून एका करारावर स्वाक्षरी करून घेतली. नवरा मुलगा हरिप्रसाद हा तामिळनाडूतील स्थानिक संघ सुपरस्टारचा कर्णधार आहे आणि त्याच्या मित्रांनी २० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक करार लिहून आणला,  त्यात त्यांनी विकेंडमध्ये हरिप्रसादला क्रिकेट खेळण्याची परवानगी द्यावी असे नमूद केले होते.

''मी पूजा, हरिप्रसाद याला शनिवार व रविवारी सुपर स्टार क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळण्याची परवानगी देते,''असे त्या करारात लिहिले होते. नवरी मुलगी पूजा हिला हे वाचून हसू आवरले नाही आणि तिने करारासोबत फोटोही काढून घेतला. तिने करारावर स्वाक्षरी करताच सारेच हसू लागले. लग्नानंतरही आपला कर्णधार क्रिकेट मॅचसाठी उपलब्ध असेल याचा आनंद मित्रांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कराराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.   

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTamilnaduतामिळनाडू