शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:05 IST

इटलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू झाला असून या घटनेमुळे कॉस्मेटिक सर्जरीच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आजच्या काळात स्वतःला सुंदर आणि आकर्षक दाखवण्याची एक मोठी स्पर्धाच सुरू झाली आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि आधुनिक जीवनशैलीमुळे लोक आपल्या शरीरावर नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग म्हणजे 'कॉस्मेटिक सर्जरी', ज्याच्या मदतीने लोक अधिक सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. इटलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू झाला असून या घटनेमुळे कॉस्मेटिक सर्जरीच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

कोण होती यूलिया बुर्तसेवा?

यूलिया बुर्तसेवा ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे ७०,००० फॉलोअर्स होते. ३८ वर्षीय यूलिया इटलीतील नेपल्स येथे पती ज्युसेपे आणि आपल्या लहान मुलीसोबत राहत होती. सोशल मीडियावर त्या एक प्रेमळ आई म्हणून ओळखली जाते. आपल्या मुलीसोबतचे दैनंदिन ब्लॉग, विनोद, खेळ आणि वैयक्तिक आरोग्याशी संबंधित माहिती ती सतत शेअर करत होती.

४ जानेवारीच्या सुमारास यूलिया कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी इटलीहून रशियाची राजधानी मॉस्को येथे गेली होती. सर्जरीच्या काही वेळ आधीही तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये ती अत्यंत आनंदी दिसत होती. मात्र मॉस्कोमधील एका क्लिनिकमध्ये सर्जरी झाल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

नेमकी कोणती सर्जरी केली होती?

रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूलियाने मॉस्कोच्या एका क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक सर्जरी केली. नितंब अधिक सुडौल आणि मोठे करण्यासाठी सर्जरी केली होती. सर्जरीनंतर काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाली आणि दुर्दैवाने तिला जीव गमवावा लागला.

'एनाफिलेक्टिक शॉक' ठरला मृत्यूचं कारण

मिळालेल्या माहितीनुसार, सर्जरी दरम्यान यूलियाला 'एनाफिलेक्टिक शॉक' बसला. ही एक प्रकारची तीव्र एलर्जीक रिॲक्शन असते, जी औषधे किंवा भूल देण्याच्या प्रक्रियेमुळे होऊ शकते. यात ब्लड प्रेशर झपाट्याने कमी होतो, शरीरावर रॅशेस येतात आणि सूज येते. ही स्थिती अत्यंत जीवघेणी ठरू शकते आणि या प्रकरणातही तेच घडलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Influencer dies after cosmetic surgery; quest for beauty turns fatal.

Web Summary : Social media influencer Yulia Burtseva died after undergoing cosmetic surgery in Moscow to enhance her buttocks. She suffered an anaphylactic shock during the procedure, leading to her death. The incident raises concerns about cosmetic surgery safety.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया