शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: मृत महिलेला टोचली कोरोनाची लस; २ महिन्यापूर्वी झाला होता मृत्यू, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 17:12 IST

इतकचं नाही तर जेव्हा या महिलेचे अंतिम लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे

बलरामपूर – देशात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. युद्धस्तरावर विक्रमी लसीकरण केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. लसीकरणाशी निगडीत अजब प्रकार यूपीच्या बलरामपूर येथून समोर येत आहे. ज्याठिकाणी दोन महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

इतकचं नाही तर जेव्हा या महिलेचे अंतिम लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा आरोग्य विभागाच्या टीम ही मानवी चूक असल्याचं सांगून हात वर केले. हा प्रकार बलरामपूर येथील उतरौला भागातील आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका टीमने हा कारनामा केला आहे. या केंद्रावर १४ एप्रिल २०२१ रोजी राजपती नावाच्या ८१ वर्षीय महिलेला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी द्यायचा होता. पंरंतु याच काळात ४ जून रोजी महिलेचा अचानक मृत्यू झाला. परंतु महिलेच्या निधनानंतर २ महिन्यांनी २८ ऑगस्टला त्यांनी दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला. त्यानंतर महिलेचे लसीकरण प्रमाणपत्रही जारी करण्यात आले.

प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकरणाची भनक जेव्हा मृत महिलेच्या नातेवाईकांनी लागली तेव्हा त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करत सोशल मीडियावर टाकलं. महिलेच्या कुटुंबातील दीपक वर्मा यांनी हे लसीकरण प्रमाणपत्र शेअर केले. जे सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर एसीएमओ अरुण वर्मा यांच्या कानावर हा प्रकार पडला. तेव्हा ते मृत महिलेच्या घरी पोहचले आणि प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. एसीएमओला मृत महिलेचं लसीकरण झाल्याबाबात प्रश्न विचारला असता त्यांनी ही मानवी चूक असल्याचं सांगितले. वास्तविक या सेंटरवर मृत महिलेचे लसीकरण झालं होतं. तिथेच त्यांची नातेवाईक संवारी देवी यांना दुसरा डोस दिला. त्यादिवशी ऑपरेटरकडून चुकीने मृतकाचे आधारकार्ड टाकले त्यामुळे मृत महिलेच्या नावावर लसीकरण प्रमाणपत्र जारी करण्यात आले असं ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. सध्या हा एक प्रकार समोर आला आहे. परंतु आणखी काही असं घडलंय का? हे तपासून घेतलं जाईल. कुणी जाणुनबुजून हे काम केले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या