शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या १ तासानंतर जोडप्याने मागितला घटस्फोट; कोर्टाने दिला अनोखा सल्ला, सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 17:33 IST

पतीने कोर्टात विनंती केली की, आमचं भावनिक नातं तुटलं आहे. मी माझ्या पत्नीसोबत राहू शकत नाही.

ठळक मुद्देपतीने जाणुनबुजून लग्न करुन माझा विश्वासघात केला, पत्नीचा आरोपपतीकडून ३ लाख युआन म्हणजे ३४ लाख ३० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावीपती-पत्नी यांच्यातील भावनिक नातं संपलं आहे हे सिद्ध करू शकले नाहीत

बीजिंग – लग्न हे एका जन्माचं नाही तर ७ जन्माचं नातं असतं. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना खूप विचाराअंती निर्णय घेतला. एखाद्या लाईफ पार्टनरसोबत आयुष्य घालवायचं म्हटल्यांवर थोडा वेळ का होईना घ्यायलाच लागतो. परंतु चीनमध्ये जो प्रकार घडलाय तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नवीन जोडप्यांनी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले.

चीनच्या युन्नान प्रांतातील घटना

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या काही तासांतच घटस्फोट मागण्याचा हा प्रकार चीनच्या दक्षिण प्रांतातील युन्नान येथे घडला. रिपोर्टनुसार, नवरदेव एक कॉलेज स्टुडंट आणि पत्नी ही नर्स आहे. पतीने कोर्टात सांगितले की, आम्हा दोघांचे अफेयर होते. परंतु मी लग्न करु इच्छित नाही. याआधीही आमचं ब्रेक अप झालं आहे. तरीही पत्नीने सतत मेसेज करून मला त्रास दिला. लग्नासाठी पत्नीने माझ्यावर दबाव टाकला. तिच्या दबावापोटी मी लग्न करण्यासाठी तयार झालो परंतु आता मला आझाद करा असं त्याने सांगितले.

पत्नीने मागितले ३४ लाख पोटगी

पतीने कोर्टात विनंती केली की, आमचं भावनिक नातं तुटलं आहे. मी माझ्या पत्नीसोबत राहू शकत नाही. त्यामुळे कोर्टाने आम्हाला वेगळं होण्याची परवानगी द्यावी. तर पत्नीने कोर्टात दावा केला की, पतीने जाणुनबुजून लग्न करुन माझा विश्वासघात केला. त्यासाठी पतीकडून ३ लाख युआन म्हणजे ३४ लाख ३० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कोर्टात केली.

कोर्टाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

पती-पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाने कोर्ट चक्रावले. कोर्टाने सांगितले की, पती-पत्नी यांच्यातील भावनिक नातं संपलं आहे हे सिद्ध करू शकले नाहीत. त्यासाठी या दोघांचा घटस्फोट अर्ज फेटाळण्यात येत आहे. इतकचं नाही तर कोर्टाने दोघांना हनीमूनसाठी जा असा सल्ला देत याचिका फेटाळून लावली आहे.

लग्न हा सन्मानाचा विषय

पती-पत्नी दोघांमधील लग्न आणि घटस्फोट ही बातमी चीनच्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटिझन्स म्हणतात की,  लग्न करणे हा एक सन्मानाचा विषय आहे. हा लहान मुलांचा खेळ नाही. तर अनेकांनी खटल्याच्या नादाला लागण्याऐवजी एकमेकांना समजून घ्या असा सल्लाही दिला आहे.

 

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालय