शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अरे बापरे! रेल्वे ट्रॅकवर अडकली कार, तितक्यात समोरून आली ट्रेन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 18:49 IST

बुधवारी दुपारी 1.57 वाजता मोतिहारी-आनंद विहार एक्स्प्रेस ट्रेन (14009) चंदौसी येथून जात होती.

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असूनही, एक कार चालक जबरदस्तीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे कार रेल्वे ट्रॅकवर अडकली. कार अडकलेली पाहून गेटमनने कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. त्यामुळे ट्रेन तातडीने थांबवण्यात आली.

ट्रेन सिग्नल पार करून फाटकाच्या दिशेने निघाली होती. त्यावर गेटमनने लाल झेंडा दाखवून रेल्वे क्रॉसिंगपूर्वी ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बुधवारी दुपारी 1.57 वाजता मोतिहारी-आनंद विहार एक्स्प्रेस ट्रेन (14009) चंदौसी येथून जात होती. अशा परिस्थितीत गेटमन संजीव कुमार रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद करत होते. याच दरम्यान, स्विफ्ट डिझायर कार चालकाने घाईघाईने कार क्रॉसिंगमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, कार दोन फाटकच्या मध्ये ट्रॅकवर अडकली.

संजीव कुमार यांनीही ट्रॅककडे न पाहता गेट बंद केलं. इकडे कार ट्रॅकच्या मधोमध अडकली तेव्हा क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला उभे असलेले लोक मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. आवाज ऐकून गेटमन संजीव यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. यावर त्यांनी घाईघाईने कंट्रोल रुमला ट्रेन थांबवण्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत ट्रेन सिग्नल ओलांडून फाटकजवळ आली होती.

ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून कार चालकाने कार ट्रॅकवरच सोडून पळ काढला. नंतर गेटमनने तातडीने एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवून थांबण्याचा इशारा दिला. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा स्थानिक लोकांनी कार रेल्वे ट्रॅकवरून बाजुला केली आणि ट्रेन पुढे गेली. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने गेटमनला सस्पेंड करण्यात आलं आहे. कारण, त्यांनी न बघता फाटक बंद केलं होतं. चंदौसी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक हरभजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन जात असतानाच ट्रॅकवर स्विफ्ट डिझायर कार अडकली होती. त्यानंतर गेटमनने लाल झेंडा दाखवून ट्रेन थांबवली. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :carकार