Amy Grabowski या फोटोग्राफरने काढलेला एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण असा फोटो लोकांनी कधी पाहिलाच नव्हता. वीज आणि दोन इंद्रधनुष्य एकाच फोटो तिने कॅप्चर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियात या अद्भूत फोटोला लोकांची भरभरून पसंती मिळत आहे. फेसबुक आतापर्यंत ५२ हजार लोकांनी हा फोटो शेअर केलाय. हा फोटो Ed Russo नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला आहे.
फेसबुक यूजर्स या फोटोवर कमेंटही करत आहेत. त्यांना हा फोटो फारच आवडला. कारण असं फार क्वचित होतं की, आकाशात वीज आणि इंद्रधनुष्य एकत्र बघायला मिळेल. तसेच विजेला कॅमेरात कॅप्चर करणेही देखील फार कठीण असतं. तसेच या फोटोत दोन-दोन इंद्रधनुष्य दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. कारण या फोटोत गुलाबी रंगाचा इंद्रधनुष्य बघायला मिळाला होता.