शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

घर विकत घ्या, सोबत पतीही मिळणार मोफत, विचित्र ऑफर पाहून लोक अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:40 IST

फ्लोरिडा येथील एका महिलेने घर खरेदी करणाऱ्यांना अनोखी ऑफर दिली आहे.

मियामी : अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. फ्लोरिडा येथील एका महिलेने घर खरेदी करणाऱ्यांना अनोखी ऑफर दिली आहे. व्यवसायाने रिअल इस्टेट एजंट असलेल्या या महिलेने घरासह तिच्या माजी पतीला मोफत देण्याची घोषणा केली आहे. तिचा माजी पती घराच्या नवीन मालकासाठी स्वयंपाक, साफसफाई यांसारखी घरातील सर्व कामे करेल, असेही तिने जाहिरातीत सांगितले आहे. महिलेने पतीसह या घराची किंमत जवळपास सात लाख डॉलर म्हणजेच सुमारे पाच कोटी रुपये ठेवली आहे. तसेच पतीसोबत घर खरेदी करण्याची तयारी असल्यास विशेष सवलतही मिळेल. सोशल मीडियात सध्या ही जाहिरात चर्चेत आहे. 

४३ वर्षीय महिला क्रिस्टल बॉलने सोशल मीडियावर तिच्या घराचा आणि माजी पतीचा फोटोही शेअर केला आहे. अनेकांनी या डीलमध्ये रस दाखवला आहे. महिलेने दिलेल्या जाहिरातीत तिचा माजी पती घराच्या वेगवेगळ्या भागात छायाचित्रांसाठी पोज देत आहे. क्रिस्टलने सांगितले की सात वर्षांपूर्वी तिचं रिचर्डसोबत लग्न झाले आणि अलीकडेच त्यांचा घटस्फोट झाला आहे. 

क्रिस्टल आणि रिचर्ड हे व्यावसायिक भागीदार देखील असून, त्यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोट झाला असला तरीही दोघांच्या नात्यात कोणताही तणाव नाही. परंतु, अजूनही अनेक प्रॉपर्टी आहेत ज्यात दोघेही समान भागीदार आहेत. या कारणास्तव, तिने घर विकण्यासाठी तिच्या माजी पती रिचर्डला देखील पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे. घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी अशी तिची इच्छा आहे.

वेबसाइटवरून जाहिरात काढलीघर खरेदीसाठी जास्त ग्राहक आकर्षित व्हावे यासाठीही खास ऑफर घोषित केल्याचे तिने सांगितले. मात्र, घर विकणारे काही दलाल माजी पतीसह घराच्या विक्रीला विरोध करत आहेत. असे करणे कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. क्रिस्टलने पुढे सांगितले की, तिचे घर विकणारी जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे; कारण काही लोक पॅकेजमध्ये माजी पतीचा समावेश करण्यास विरोध करत आहेत.

टॅग्स :Americaअमेरिका