शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

करून दाखवलं! शाळेतल्या बॅकबेंचरनं पटवली टॉपर; लग्न मंडपात तिला पाहून आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 12:29 IST

बॅकबेंचर अन् टॉपरची प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण; १० वर्षांचा प्रवास दाखवणारा १० सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल

शाळेत विद्यार्थ्यांचे तसे दोन प्रकार असतात. टॉपर आणि बॅकबेंचर. टॉपर बॅकबेंचर्सकडे पाहून नाकं मुरडतात. तर बॅकबेंचर्स टॉपर्सना पुस्तकी किडे म्हणून हिणवतात. एखाद्या बॅकबेंचरला टॉपर मुलगी आवडली, तर ती सहजासहजी भाव देत नाही. कारण बॅकबेंचर्सबद्दल लोकांच्या मनात एक साचेबद्ध प्रतिमा निर्माण झालेली असते. यांचं पुढे काय होणार, आयुष्यात पुढे यांना काय जमणार, असे प्रश्न त्यांच्याकडे पाहून टॉपर्सना पडतात. त्यामुळेच टॉपर आणि बॅकबेंचर्सचं सूत जुळेल आणि त्यांची कहाणी विवाहापर्यंत पोहोचेल, ही शक्यताच तशी कमी असते. मात्र एका बॅकबेंचरनं ही किमया साधली आहे. त्यांच्या प्रेमकहाणीचा १० सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

बॅकबेंचर टॉपरच्या प्रेमात पडल्यावर बऱ्याचदा बॅकबेंचरच्या पदरी निराशाच येते. मात्र टॉपरसोबत लगीनगाठ बांधण्याचं एका बॅकबेंचरचं स्वप्न साकार झालं आहे. त्यानं व्हिडीओ शेअर करत त्याची प्रेमकहाणी थोडक्यात सांगितली आहे. त्यात शाळेच्या गणवेशातील एअर एंडर फोटो आहे. मुलगा मागच्या रांगेत बसला आहे, तर टॉपर मुलगी सर्वात पुढे असलेल्या रांगेत बसली आहे. शाळेत बॅकबेंचर असलेल्या मुलानं तरुणपणी मुलीसोबत ओळख वाढवली. दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. रेस्टॉरंटमध्ये भेटीगाठी होऊ लागल्या. शेवटी ही प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण होत लग्न मंडपापर्यंत पोहोचली.

लग्नात एकमेकांना हार घालण्यासाठी वधू वर समोरासमोर आले. त्यावेळी वराचा आनंद गगनात मावत नव्हता. स्वप्नपूर्तीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. त्याला हसताना पाहून वधूदेखील गोड हसत होती. अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओतून दोघांनी त्यांची प्रेमकहाणी शेअर केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. इन्स्टाग्रामवर छवी आणि सत्या नावाच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.