शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेली, पण हिंमत नाही; आयुष्य संपलेले नाहीये म्हणत कॉर्पोरेट सोडून राकेश चालवायला लागला रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:37 IST

कॉर्पोरेटमधील नोकरी गेल्यानंतर ऑटो चालवणाऱ्या बंगळूरुकर ड्रायव्हर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Auto Driver: सध्याच्या धावपळीच्या कॉर्पोरेट जगात, जिथे जास्त पगाराच्या नोकऱ्या गमावल्याने लोक पूर्णपणे खचून जातात, तिथे बंगळूरुच्या एका ऑटोचालकाची कहाणी सोशल मीडियावर सध्या लाखो लोकांना जगण्याचा खरा अर्थ शिकवत आहे. आपली जास्त पगाराची कॉर्पोरेट नोकरी गमावल्यानंतर प्रचंड नैराश्यात गेलेल्या या व्यक्तीने हार न मानता साधेपणाने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने बनवलेला एक छोटासा व्हिडिओ 'एका पराभवानंतर आयुष्य संपत नाही' हा मौल्यवान संदेश देत आहे.

'मी खचलो होतो, पण आता लढायला तयार आहे!

राकेश नावाच्या या ऑटोचालकाने आपला व्हिडिओ अशा लोकांसाठी बनवला आहे, ज्यांना आयुष्यात एकदा अपयश आल्यावर जगणे असह्य वाटते. राकेश व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे सांगतो, "मी आयुष्याची आशा सोडली होती आणि मला वाटले होते की मी कधीच यातून सावरू शकणार नाही." पण परिस्थिती स्वीकारून त्याने पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला. तो पुढे म्हणतो, "पण आता मी इथे ऑटो चालवत आहे आणि माझे आयुष्य संपलेले नाहीये. आता माझ्या मार्गात जे काही येईल, त्याला मी सामोरे जाईन, मी अजिबात घाबरलेलो नाही."

राकेशच्या मते, पैसा आवश्यक आहे, पण तोच सर्वस्व नाही. "आयुष्यात अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या पैशापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. आपल्या जीवनाची किंमत करा आणि तुमचा खरा उद्देश शोधा," असा मोलाचा सल्ला तो देतो.

राकेशचा हा व्हिडिओ @WokePandemic नावाच्या युजरने एक्सवर पोस्ट केला आहे. "बंगळूरुमध्ये कॉर्पोरेट नोकरी गमावून आता ऑटो रिक्षा चालवणारा हा माणूस. त्याचा जीवन आणि पैशाबद्दलचा संदेश खास आहे," असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

आव्हानांना घाबरू नका, तोंड द्या!

राकेशचे म्हणणे हेच आहे की आयुष्यात येणाऱ्या अडचणींना टाळणे किंवा त्यापासून पळून जाणे व्यर्थ आहे. समस्या तुमच्याच आहेत, त्या सोडवण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. व्हिडिओच्या शेवटी तो म्हणतो, "आपल्या अडचणींना घाबरू नका, पळून जाऊ नका, त्याला सामोरे जा."

या व्हिडिओने सोशल मीडियावरील अनेक युजर्संना विचार करायला लावला आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, 'त्या चमकदार काचेच्या इमारती बाहेरून खूप चांगल्या दिसतात, पण आतून ते नरक आहे. कॉर्पोरेट आयुष्याची ही दुःखद कहाणी आहे.' तर दुसऱ्या एका यूजरने सांगितले की, 'पैसा नेहमीच कमी असतो. तुम्हाला फक्त गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च करण्याची सवय सोडावी लागेल आणि क्षणोक्षणी जगावे लागेल.' 

English
हिंदी सारांश
Web Title : Job Lost, Spirit Intact: Corporate Dropout Drives Auto in Bangalore

Web Summary : Losing his corporate job, Rakesh from Bangalore turned to driving an auto-rickshaw. His inspiring video emphasizes life's value beyond money, urging viewers to face challenges head-on and find true purpose after setbacks. He shares a message of resilience.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलjobनोकरीBengaluruबेंगळूर